शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

भडगाव तालुक्यातील तांदूळवाडी येथे भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 15:07 IST

कजगाव येथून जवळच असलेल्या तांदूळवाडी, ता.भडगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, येथे तत्काळ टँकर सुरू करावे, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीकडे केली आहे

ठळक मुद्देगावासाठी तत्काळ टँकर सुरू करण्याची मागणीहिवाळ्यातच आटली गावविहीरग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंतीतितूर नदीत पावसाळ्यातही पाणी नाही

कजगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : कजगाव येथून जवळच असलेल्या तांदूळवाडी, ता.भडगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, येथे तत्काळ टँकर सुरू करावे, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीकडे केली आहेसाधारण अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून येथे पाणी प्रश्न फारच बिकट बनला आहे. यामुळे गावापासून साधारण तीन ते चार किलोमीटर अंतरावर उमरखेड शिवारात एक विहीर अधिग्रहित केली होती. जेमतेम पाण्यामुळे येथे साधारण पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत असे. मात्र अधिग्रहित विहिरीनेदेखील तळ गाठल्याने पाणी प्रश्न बिकट झाला आह.ेगावातील विहिरी कोरड्या झाल्याया परिसरात गेल्या दोन वर्षांत पावसाळा तुरळक झाल्याने विहिरींत जलपातळ्या वाढल्या नाही. परिणामी गावातील विहिरी चक्क हिवाळ्यातच कोरड्या पडल्या आहेत. यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळ नाही, विहिरी आटल्याने ग्रामस्थांना परिसरातील शेत शिवारातून बैलगाडी, सायकल, तर गोरगरिबांना चक्क डोक्यावर हंडे ठेवून पाणी आणावे लागत आहे.तितूर नदीचे पाणी हरणभडगाव तालुका हा संपूर्ण गिरणा लाभक्षेत्रात मोडला जातो. मात्र या तालुक्यातील पाच गावांना याचा कोणताही लाभ नाही. तर या पाच गावासाठी अमृत असलेल्या तितूर नदीचे पाणी पावसाळ्यातच गायब झाले आहे कारण तितूर नदीवर चाळीसगाव तालुका सीमेपर्र्यंत अनेक ठीकाणी सिमेंटचे पक्के बंधारे बनविण्यात आले आहेत. परिणामीे भडगाव तालुक्यातील गावात तितूर नदीचे पाणी आलेच नसल्याने मळगाव, तांदूळवाडी, भोरटेक, उमरखेड, कजगाव, पासर्डी या सहा गावांसह पाचोरा तालुक्यातील पिंप्री व घुसर्डी या आठ गावात तितूरचे पाणी चक्क पावसाळ्यातदेखील पोहोचले नाही. परिणामी आतापासून या गावात पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. यात मळगाव व तांदूळवाडीचा पाणी प्रश्न फारच बिकट झाला आहे इतर ही गावात पाणी समस्या आहे मात्र पर्याय शोधत पाणी प्रश्न काही प्रमाणात सोडविला जात आहे मात्र एप्रिलमध्ये या आठही गावात भीषण पाणीटंचाई निर्माण होईल असेच चित्र दिसत आहे.पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच गुरढोराचा पाणी प्रश्न बिकटमार्चच्या पहिल्याच आठवड्यात तांदूळवाडी येथे पाणी प्रश्न अत्यंत बिकट बनला आहे. येथे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची तहान शेत शिवारातून पाणी आणून भागविली जात आहे. मात्र गुरढोराचा पाणी प्रश्न अत्यंत बिकट झाला आहे. कारण शेत शिवारातील अनेक विहिरी कोरड्या पडल्या आहेत तर काहींनी तळ गाठला आहे. अशा परिस्थितीत गुरांना पाणी उपलब्ध करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.आठ खेड्यातील बहुतांश विहिरी कोरड्यागेल्या पावसाळ्यात वरील आठ गावात तितूर नदीत पाणी पोहचलेच नसल्याने शेत शिवारातील विहिरी,गावातील विहिरी यांच्या जल पातळ्या वाढल्या नसल्याने पाणी समस्या निर्माण होत आहे कारण बºयाच विहिरी या कोरड्या पडल्या आहेत तर काही विहिरी चोवीस तासच्या ब्रेकनंतर अर्धा ते एक तास चालतात. यात गुरढोराचा पाणी प्रश्न सुटत आहे 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhadgaon भडगाव