हरिविठ्ठलनगरात किराणा दुकानदाराला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:16 IST2021-05-19T04:16:12+5:302021-05-19T04:16:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गल्लीतील रोहित्रामध्ये छेडछाड करणाऱ्यांना जाब विचारला असता शिवाजी दयाराम पाटील या किराणा दुकानदाराला तिघांनी ...

Grocery shopkeeper beaten in Harivithalanagar | हरिविठ्ठलनगरात किराणा दुकानदाराला मारहाण

हरिविठ्ठलनगरात किराणा दुकानदाराला मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गल्लीतील रोहित्रामध्ये छेडछाड करणाऱ्यांना जाब विचारला असता शिवाजी दयाराम पाटील या किराणा दुकानदाराला तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना हरिविठ्ठलनगरात १६ मे रोजी घडली. याप्रकरणी अजय दिलीप कोळी, सोनू दिलीप कोळी व दिलीप कोळी या तिघांविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

शिवाजी पाटील यांच्या घरासमोर विजेचा ट्रान्सफार्मर आहे. वायरमन नसताना या ट्रान्सफॉर्मरवर कोळी परिवारातील सदस्य छेडछाड करीत होते, त्यामुळे पाटील यांच्या घरातील वीज पुरवठा खंडित होऊन इलेक्ट्रिक साहित्यांचे जळून नुकसान झाले. पाटील यांनी त्याचा जाब विचारला असता तिघांनी पाटील यांना फावड्याच्या लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले त्यांना गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथून उपचार घेतल्यानंतर पाटील यांनी सोमवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास हवालदार सुनील पाटील करीत आहेत.

Web Title: Grocery shopkeeper beaten in Harivithalanagar