उमाजी नाईक यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:21 IST2021-09-08T04:21:55+5:302021-09-08T04:21:55+5:30
जळगाव : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण ...

उमाजी नाईक यांना अभिवादन
जळगाव : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, तहसीलदार सुरेश थोरात, तहसीलदार जितेंद्र कुंवर उपस्थित होते.
विलास नारखेडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कारजळगाव : येथील बहिणाबाई विद्यालयातील क्रीडाशिक्षक डॉ. विलास नारखेडे यांना मुक्ताईनगर येथील शिवचरण फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय ई - आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे. नारखेडे यांनी आतापर्यंत १५ रिसर्च पेपर तयार केले आहे. त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी संगीता धानोरकर आणि डॉ. शिवचरण उज्जैनवाल उपस्थित होते.
प्रवीण पाटील यांना श्री साई शिक्षकरत्न पुरस्कार
जळगाव : येथील खुबचंद सागरमल विद्यालयाचे क्रीडाशिक्षक प्रवीण वसंतराव पाटील यांना श्री साई प्रतिष्ठान, पुणे यांच्यातर्फे श्रीसाई शिक्षकरत्न राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. डॉ. सुशील गुजर, डॉ. प्रताप जाधव, डॉ. रितेश पाटील यांनी त्यांचे कौतुक केले आहे.