राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना महापौरांकडून अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:15 IST2021-05-01T04:15:48+5:302021-05-01T04:15:48+5:30

जळगाव - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती मनपा इमारतीत साजरी करण्यात आली. मनपा इमारतीत आयोजित कार्यक्रमात महापौर जयश्री ...

Greetings from Mayor to Rashtrasant Tukadoji Maharaj | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना महापौरांकडून अभिवादन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना महापौरांकडून अभिवादन

जळगाव - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती मनपा इमारतीत साजरी करण्यात आली. मनपा इमारतीत आयोजित कार्यक्रमात महापौर जयश्री महाजन यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपमहापौर कुलभूषण पाटील, अपर आयुक्त विद्या गायकवाड आणि कर्मचारीवृंद उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनीही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

कोरोनामुळे सोमवारचा लोकशाही दिन रद्द

जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने महिन्याच्या पहिल्या सोमवारी महापालिकेत आयोजित होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. याबाबत मनपा अतिरिक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी आदेश काढले आहेत.

ग्रामीण भागात लपंडाव सुरूच

जळगाव - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिक घरीच थांबून आहे. मात्र ग्रामीण भागात दररोज विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच तापमान देखील वाढ होत असल्याने नागरिकांना घरी थांब होत आहे. महावितरण कंपनीने सुरळीत वीजपुरवठा अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Greetings from Mayor to Rashtrasant Tukadoji Maharaj