शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

ब्रश पकडणेही शक्य नसताना त्यांच्याकडूनही शुभेच्छा पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 7:36 PM

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत शुभेच्छा कार्डांच्या किमयेविषयी लिहिताहेत कलावंत जयंत पाटील...

मी आनंदवनात होतो़ काही काळ वास्तव्यानंतर वाटले, ज्या लोकांना बोटे नाहीत, ज्यांच्या हातांना जखमा आहेत़ त्यामुळे त्यांना पेन्सील, ब्रश पकडणे अशक्यच होते आणि मला वाटते त्यांच्यासाठी शुभेच्छाकार्ड तयार करण्याचा विभाग सुरू केला तर? डॉ़विकास आमटे यांनीदेखील संमती दिली आणि मग काय, कल्पनाच कल्पना सुचल्या. चिमणचारा, शेवमेंढा, लाकडाचा रंधा करताना निघालेले भेंडोळे, शिंंप्याकडच्या निघालेल्या च्ािंंध्या असे सारे साहित्य वापरून हळुहळु रुग्णांमध्ये आत्मविश्वास यायला लागला़ मला एका आनंदवन प्रेमी व्यक्तीकडून रविंद्रनाथ टागोरांचे.़़ हे छोट्या-छोट्या कणिका कवितांचे पुस्तक मिळाले होते़ त्यातल्या काही दोन-दोन, तीन-तीन ओळींच्या कविता आम्ही शुभेच्छा कार्डामध्ये वापरल्या. या पेशंटमधून रमेश अम्रू हा एक उत्साहाने सळसळणारा तरूण मिळाला आणि शुभेच्छा कार्डानी चांगलाच वेग घेतला़शुभेच्छा कार्डविभाग चहुअंगानी बहरला. १९८० साली अगदी सप्टेंबर महिन्याच्या ९ तारखेला म्हणजे माझ्या वाढदिवशी मी आनंदवनातून घरी परतलो. आपण पाहात आहात, त्या शुभेच्छा कार्डात मी टागोरांच्या त्याच पुस्तकातील ओळी वापरल्या आहेत़ पण तुमच्या लक्षात आले की, त्यावेळी टाईपराइटींग वगैरे काही प्रकार नव्हता़ म्हणूनच मी तो सारा मजकूर हाताने लिहिला आहे़ जळगावात ब्लॉकमेकर्स होतेच पण मी माझ्या काही कमर्शिअल कामांसाठी मुंबईहून ब्लॉक करून आणायचो़ या शुभेच्छा कार्डाचे ब्लॉक्सही मुंबईहून करून आणले होते़ कार्डाचे प्रीटीग कोलते बंधू यांच्या प्रेसमध्ये झाले आहे़ शंभर-सव्वाशे कार्डस छापले असावेत़ १९८१ ला माझे शैलजाशी लग्न झाले़ म्हणूनच शुभेच्छा कार्डावर आमची दोघांची नावे आहेत़खरं तर मी मराठी कॉपीरायटर, पण मला या शुभेच्छा कार्डात इंग्रजीचा आधार लागला़ या पुढची सर्व शुभेच्छा कार्डे मराठीत आहेत़ माझ्या एकही शुभेच्छा कार्डात मी सुखसमृद्धीच्या शुभेच्छा कधीच दिलेल्या नाहीत़ जगताना आपल्याला वेगळेच काही लागते़ आनंदवनात जाण्याआधी मी कोल्हापुरात एका जाहिरात एजन्सीत आर्टिस्ट म्हणून काम करीत होतो़ मी शिक्षणासाठी बाहेर पडण्याआधी माझ्या आसोद्याच्या समृद्ध वाचनालयाने माझे आधीच बौद्धीक भरण- पोषण केले होते़ पुणे-कोल्हापुरात वाचणारे मित्र मिळालेत. पुस्तकांनी जो माझ्या गळ्यात हात घातला तो सत्तरीच्या वळणावरही तसाच आहे़ पुढच्या सर्व शुभेच्छाकार्डावर मन:पूर्वक जगण्यातून आलेले अनेक सुखद कवडसे आहेत़ माझ्या वाचन-चिंतनासाठी मी कठोरपणे सार्वजनिक जीवन नाकारले कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायचे तऱ़़‘दुर हजारांपासूनी विजनामधी माझे घरटे मी पण भरले जयांत माझे जे आहे माझ्या पुरते’़स्वत:चे एकटेपण प्राणपणाने जपणे, स्वत:वर कधीच कोणती दडपणे येऊ न देणे हे आता व्रताच झाले आहे़ (क्रमश:)-जयंत पाटील, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव