पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे घराचे छत कोसळून आजी व नातवाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 12:43 IST2019-10-05T12:42:33+5:302019-10-05T12:43:04+5:30

तीन जखमी

Grandfather and grandson died after falling off the roof | पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे घराचे छत कोसळून आजी व नातवाचा मृत्यू

पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथे घराचे छत कोसळून आजी व नातवाचा मृत्यू

पाचोरा, जि. जळगाव : घराचे छत कोसळून आजीचा व नातवाचा झोपेतच करुण अंत झाल्याची घटना ४ रोजी रात्री ११ वाजता नांद्रा, ता. पाचोरा येथे घडली. अन्य तिघांना वाचविण्यात यश आले आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, नांद्रा येथील नवेगाव वस्तीतील रहिवासी शोभाबाई नामदेव पाटील हे भाड्याच्या घरात राहतात. ४ रोजी रात्री ११ वाजता कुटूंब गाढ झोपेत असताना अचानक घराचे माती धाब्याचे छत कोसळून त्याखाली दबून शोभाबाई नामदेव पाटील (वय ५० वर्षे) व त्यांचा नातू समर्थ संदिप पाटील (वय सव्वा वर्षे, रा.लोण ता.एरंडोल) या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबातील इतर सदस्य एक मुलगा व दोन मुली यांना वाचवण्यात यश आले. ते किरकोळ जखमी झाले.

Web Title: Grandfather and grandson died after falling off the roof

टॅग्स :Jalgaonजळगाव