शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आजीच्या बटव्यातील धैर्याने नातवांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 12:19 IST

आभाळाऐवढी माया: वृद्धेने नातवांसह कोरोनाचा लढा जिंकला, नातवांसाठी केला क्वारंटाईन सेंटरला मुक्काम

जळगाव : नातवंडे छोटी असल्याने कोरोनाच्या संकटात एकटी कशी राहतील, या चिंतेने ६३ वर्षीय आजी दहा दिवसाच्या कोरोनामुक्ती नंतरही तीन दिवस कोविड केअर सेंटरमध्ये मुक्कामी राहिल्या व नातवांसोबत कोरोनाशी लढा देत त्या सुखरूप घरी घेऊन आल्या़़़ जळगावातील कोविड केअर सेंटरमधील कोरोनाला हरविणाऱ्या आजी व नातवाची ही कहाणी़़़ममुराबाद ता़ जळगाव येथील रहिवासी असलेल्या एका ६३ वर्षी वृद्धेला ताप येत होता़ सतत येणारा ताप यामुळे खासगी डॉक्टरांकडे उपचार घेतले़ एक्सरे काढला यात न्यूमोनियाची लक्षणे जाणवली डॉक्टरने सांगितल्यानुसार कुटुंबियांनी तातडीने जळगाव शासकीय तंत्रनिकेतनला महाविद्यालयात जावून तपासणी करून घेतली व त्यात या आजी कोरोना बाधित आढळून आल्या़ २८ जुलै रोजी त्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले़ यानंतर संपूर्ण कुटुंबाची कोरोना चाचणी झाली़ यात १६ वर्षीय व १० वर्षीय असे दोघे नातवंडे ३० जुलै रोजी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले़ त्यांनाही कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले़नातवांना दिले बळ६ जुलैला आजीच्या उपचाराचे दहा दिवस पूर्ण झाले़ मात्र, नातवांच्या उपचाराचे तीन दिवस बाकी होते़ त्यामुळे आपण जरी बरे झालेलो असलो तरी नातवांना एकटे सोडणार नाही, ते कसे राहतील, ही चिंता मनात घेऊन, आजीबार्इंनी तेथील डॉक्टरांना विनंती केली. आजीचा हट्ट आणि नातवांबद्दलची ओढ पाहून अखेर कोरोनामुक्तीनंतरही डॉक्टरांनी त्यांना नातवांजवळ राहण्याची परवानगी दिली. आजीनेही मोठ्या आनंदात तीन दिवस या नातवांसोबत घालविले. आजीमुळे नातवांना कोरोनाशी लढण्याचे मोठे बळ मिळाले व रविवारी ९ रोजी तिघेही बरे होऊन घरी परतले़घाबरून नका तुम्ही बरे व्हाल: आजीचा संदेशकोरोना झाल्यानंतर अनेक जण नैराश्यात जातात, भितात मात्र, घाबरण्यासारखा हा आजार नाही़ लवकर दवाखान्यात जर आले तर तुम्ही यातून बरे होऊन घरी सुखरूप घरी जावू शकतात़ मी मुळीच घाबरले नाही म्हणून आज सुरखरूप घरी जावू शकले, नातवांना धिर देऊ शकले, असा संदेश कोरोनामुक्त झालेल्या या ६३ वर्षीय आजींनी दिला आहे़ कोविड सेंटरला सर्व सुविधा चांगल्या होत्या़ असेही त्यांनी सांगितले़ 

टॅग्स :Medicalवैद्यकीयJalgaonजळगाव