ग्रा.पं. सदस्यांनी वाटले सॅनिटरी पॅडचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:53 IST2021-02-05T05:53:23+5:302021-02-05T05:53:23+5:30
असोदा ता. जि. जळगाव : येथील नवनिर्वाचित वाॅर्ड ३ म्हणून निवडून आलेल्या वर्षा गिरीश भोळे यांनी महिलांना ठिकठिकाणी हळदी-कुंकवाचा ...

ग्रा.पं. सदस्यांनी वाटले सॅनिटरी पॅडचे वाटप
असोदा ता. जि. जळगाव : येथील नवनिर्वाचित वाॅर्ड ३ म्हणून निवडून आलेल्या वर्षा गिरीश भोळे यांनी महिलांना ठिकठिकाणी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. पण त्यांनी या कार्यक्रमाला सामाजिक जबाबदारीची जोड देत वाण म्हणून प्रत्येक महिलेला सॅनिटरी पॅड दिलेले आहेत. या निमित्त जनजागृती करून सॅनिटरी पॅड वापरायचे आवाहन केले आहे.
लायनेस क्लबतर्फे मधुमेह तपासणी शिबिर
जळगाव : लायनेस क्लबने गणेश कॉलनीत डॉ. प्रांजली जैस्वाल यांनी मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. त्यात ४० सदस्यांनी भाग घेतला. विजया जैन, अलका जैन आणि लायनेस मेम्बर्स उपस्थित होते. पवन जैन यांनी सहकार्य केले. तसेच लायनेस क्लबने बालिका दिवस साजरा केला. त्यात मुंबईच्या सनया बोथरा हिने लहान मुलींना ज्वेलरी बनवण्यास शिकवले.