शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

सरकारने ठराव करावा, कुठेही गेलात तरी मराठीत बोला !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 11:13 IST

अभिरूप न्यायालयाचे निर्देश : न्यूनगंड सोडा, जनहित याचिकेवर २०२५ मध्ये पुन्हा सुनावणी

अमित महाबळलोकमत न्यूज नेटवर्कपूज्य साने गुरुजी साहित्यनगरी, अमळनेर : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी दाखल झालेल्या जनहित याचिकेवर रविवारी सकाळी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात भरलेल्या अभिरूप न्यायालयात कामकाज झाले. न्या. मृदुला भाटकर यांनी जनतेने कुठेही गेले तरी मराठीत बोलावे असा ठराव सरकारने करावा, त्याची अंमलबजावणी मंत्रालयातून करावी, असे निर्देश दिले. तसेच याचिकाकर्ता यांनी मराठीतून बोलण्याबद्दलचा आपला न्यूनगंड सोडून द्यावा, जनहित याचिका जिवंत ठेवण्यात येत असून, त्यावरील पुढील कामकाज २०२५ मधील साहित्य संमेलनात होईल, असेही न्या. भाटकर यांनी सांगितले.

याचिकाकर्ता विनोद कुलकर्णी व डॉ. दिलीप पाटील यांच्या वतीने ॲड. सुशील अत्रे यांनी, तर शासनाच्या वतीने विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी बाजू मांडली. शासनाच्या बाजूने प्रा. डॉ. एल. ए. पाटील, डॉ. गणेश चव्हाण, मराठी विश्वकोश मंडळाचे सचिव डॉ. श्यामकांत देवरे यांनी साक्ष नोंदवली. 

याचिकाकर्त्यांनी अभिजात मराठी भाषेचा योग्य उपयोग करण्यासाठी मराठी व्यवहाराची विविध क्षेत्रे सज्ज आहेत का, यावर मुद्दे मांडले. विनोद कुलकर्णी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. डॉ. दिलीप पाटील यांनी मराठीचा व्यवहारात उपयोग करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्र सज्ज असल्याचे सांगितले. मायबोली मराठी असलेल्यांशी मराठीतून केलेला संवाद अधिक प्रभावी ठरत असल्याचे म्हणणे त्यांनी नोंदवले. प्रा. डॉ. एल. ए. पाटील यांनी शासनाने अकरावी, बारावी आणि पदवी व पदव्युत्तर विज्ञान अभ्यासक्रमांची पाठ्यपुस्तके मराठीत होण्यासाठी निर्देश द्यावेत, असे सांगितले. डॉ. गणेश चव्हाण यांनी सर्वांत जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये भारतात मराठी तृतीय क्रमांकावर असल्याचे सांगितले.

पत्र पाठवून काय होणार...?युक्तिवादात ॲड. सुशील अत्रे यांनी, मराठीला अभिजात दर्जा मिळावासाठी शासन लाखो पत्रे राष्ट्रपतींना पाठवते; पण हा विषय संसद व विधिमंडळाच्या अखत्यारित आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी, असे निदर्शनास आणून दिले.

इंग्रजीकडे कल वाढलानीलम गोऱ्हे यांनी भाषिक आकृतिबंध इंग्रजीबहुलतेकडे सरकत असल्याचे सांगून मराठी भाषिकांची आकडेवारी कमी होत असल्याचा संदर्भ दिला. २०११ मध्ये ६८ टक्के मराठी भाषिक, तर ३२ टक्के अन्य भाषिक होते. २०२४ मध्ये मराठी भाषिक आणखी कमी झालेले असतील, असे सांगितले. शैक्षणिक दर्जावर काम करायला शिक्षणमंत्र्यांना सामाजिक व राजकीय पाठिंबा मिळत नसल्याचे सांगितले.  तसेच मराठी टिकून राहावी म्हणून सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

टॅग्स :Jalgaonजळगावakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळmarathiमराठी