गोविंदा रे गोपाळा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:37 IST2021-09-02T04:37:00+5:302021-09-02T04:37:00+5:30
गोकुळाष्टमी उत्साहात : चिमुकल्यांनी लुटला दहीहंडी फोडण्याचा आनंद लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : 'गोविंदा रे गोपाळा, मच गया शोर ...

गोविंदा रे गोपाळा...
गोकुळाष्टमी उत्साहात : चिमुकल्यांनी लुटला दहीहंडी फोडण्याचा आनंद
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : 'गोविंदा रे गोपाळा, मच गया शोर सारी नगरी मे' अशा गाण्यांच्या तालांवर विविध शाळांमध्ये मंगळवारी चिमुकल्यांनी दहीहंडी फोडली. राधा व श्रीकृष्णाच्या वेशभूषेत अवतरलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी सादर केलेली गवळण व कृष्णजन्माच्या गीतांनी या कार्यक्रमाची रंगत वाढविली. दहीहंडी फोडताच 'हाथी घोडा पालखी.. जय कन्हैया लाल की...'च्या जयघोषाने शाळेचा परिसर दणाणून गेला होता.
शिशू विकास मंदिर
शिशू विकास मंदिरात गोकुळाष्टमीनिमित्त चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राधाकृष्णाची वेशभूषा साकारली होती. त्यानंतर चिमुकल्यांनी आला रे आला गोविंदा आला...हाथी घोडा पालखी जय कन्हैय्या लाल की, अशा जयघोषात दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका साधना महाजन, वृषाली दलाल यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात शिक्षिकांनी आरती, भजने व गाणी सादर केली.
००००००००
प्रोग्रेसिव्ह किंडर गार्डन स्कूल
प्रोग्रेसिव्ह किंडर गार्डन स्कूलमध्ये दहीहंडी साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापिका श्रद्धा दुनाखे, विजया चवरे, सुषमा थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. थोरात यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीची माहिती सांगितली. विद्यार्थ्यांनीही ऑनलाइन दहीहंडीचा आनंद लुटला. संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल व संस्थेच्या अध्यक्षा मंगला दुनाखे, सचिव सचिन दुनाखे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
००००००००
के.सी.इंग्लिश मीडियम स्कूल
पिंप्राळा उपनगरामधील मानराज पार्क परिसरातील के.सी.इंग्लिश मीडियम स्कूल येथे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी राधाकृष्णाची वेशभूषा साकारली होती. नंतर या चिमुकल्यांनी दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला. याप्रसंगी प्राचार्या माधुरी कुळकर्णी यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.