दहा कुटुंबांना शासनातर्फे मदतीचे धनादेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:21 IST2021-08-19T04:21:26+5:302021-08-19T04:21:26+5:30
अमळनेर : तालुक्यातील तीन शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी एक लाख व ७ कुटुंबांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून प्रत्येकी २० ...

दहा कुटुंबांना शासनातर्फे मदतीचे धनादेश
अमळनेर : तालुक्यातील तीन शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी एक लाख व ७ कुटुंबांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून प्रत्येकी २० हजार रुपयांचा धनादेश आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
शेतकरी आत्महत्याग्रस्त आशाबाई सुनील भिल (जवखेडा), संगीता प्रेमराज पाटील (खापरखेडा प्र.डांगरी), प्रतिभा सुदाम पाटील (झाडी) या कुटुंबांना व राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेत उज्ज्वला ज्ञानेश्वर बागुल (दहिवद), सीमा जिजाबराव चव्हाण (पिंपळी, प्र.ज.), लताबाई विकास वानखेडे (आर्डी), सरला मुकेश कुंभार (मांडळ), निलाबाई ज्ञानेश्वर मालचे (अंबासन), रत्नाबाई दिनकर भिल (एकरुखी), आशाबाई पंडित अहिरे (सावखेडा) या लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले.
शासनाच्या निर्देशानुसार, दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेत समाविष्ट करून, ३० व्यक्तींना पिवळी शिधापत्रिका वाटप करण्यात आली. यावेळी तहसीलदार मिलिंद वाघ, निवासी नायब तहसीलदार योगेश पवार, डॉ.रामू पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील हजर होते.