शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी जळगावचा गोपाल तनपुरे तब्बल ८ वर्षे राहिला अनवाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 19:00 IST

मोदींची भेट होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, असा कठीण संकल्पच त्यानं केला होता.

प्रशांत भदाणे

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनेक जण फॅन आहेत. पण आज आम्ही तुम्हाला मोदींच्या अशा फॅनला भेटवणार आहोत, ज्याची तपश्चर्या पाहून तुम्ही तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाहीत. मोदींची भेट होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, असा कठीण संकल्पच त्यानं केला होता. 8 वर्षे, 13 दिवस तो अनवाणी राहिला. अखेर तो सोन्याचा दिवस उगवला आणि त्याचा संकल्प पूर्ण झाला.

नेत्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या जळगावातील भाजपच्या कार्यकर्त्याची ही कहाणी आहे. गोपाल राजमल तनपुरे असं त्याचं नाव. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात असलेल्या लोंढरी गावातील तो रहिवासी आहे. भाजपचा कट्टर समर्थक असलेला गोपाल हा भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांच्या यंग ब्रिगेडचा सदस्य आहे. नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हा त्याने एक संकल्प केला होता. मोदींची भेट होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, असं म्हणत त्याने चप्पल घालणंच सोडलं होतं. मोदींच्या भेटीसाठी त्याला तब्बल 8 वर्षे वाट पाहावी लागली. हा काळ त्याच्यासाठी सोपा नव्हता. गोपालचा मूळ व्यवसाय शेती आहे. त्यामुळे दररोज शेतात जाण्याशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीतही तो अनवाणी पायांनी राहिला. शेतातील काटे, दगड-धोंडे तुडवत त्याने आपल्या शारीरिक कष्टाची तमा बाळगली नाही.

8 वर्षांनी मोदींच्या भेटीची इच्छा झाली पूर्णपंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची गोपालची इच्छा 8 वर्षांनी पूर्ण झाली. भाजप नेते गिरीश महाजन यांनी पुढाकार घेऊन त्याची मुंबईत मोदींशी भेट घालून दिली. पुणे जिल्ह्यातील देहू येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले होते. या दौर्‍यात मोदींनी मुंबईतील कार्यक्रमांनाही हजेरी लावली. त्यावेळी आमदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून गोपालने मुंबईत मोदींची भेट घेतली. मोदींच्या चरणावर नतमस्तक झाल्यानंतर त्याचा संकल्प पूर्ण झाला. आपल्या भेटीसाठी गोपालने आठ वर्षे, तेरा दिवस पायात चप्पल घातली नाही, हे ऐकून मोदीही भारावले. मोदींनी त्याला लगेच चप्पल घालावी असं सांगितलं. मोदींच्या भेटीनंतर त्याचा संकल्प खऱ्या अर्थाने पूर्ण झालाय. इतक्या वर्षांनी त्यानं बुधवारी आपल्या पायात चप्पल घातली.

कार्यकर्तेही खुशगोपालचा संकल्प पूर्ण झाल्याने भाजप कार्यकर्तेही खुश झाले आहेत. सर्वांनी एकत्र येत गोपालसाठी नवीकोरी चप्पल आणली, त्याच्या श्रद्धेचा सन्मान करत त्याच्या पायात चप्पल घातली. गिरीश महाजन यांच्या जामनेरातील निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. महाजन यांच्या पत्नी नगराध्यक्षा साधना महाजन यांनी गोपालला नवी चप्पल दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आपल्याला खूप भावतं. त्यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मोदींच्या कामाची पद्धत खूप चांगली आहे. त्यांची भेट व्हावी हे माझे स्वप्न होतं. त्यांची भेट झाल्यानंतर मला साक्षात विठ्ठल भेटले, याची अनुभूती आली. माझा संकल्प पूर्ण झाला म्हणून मी आता आठ वर्षांनी पायात चप्पल घालणार आहे.गोपाल तनपुरे,मोदींचा चाहता

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीJalgaonजळगावGirish Mahajanगिरीश महाजन