शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावकरांसाठी गुड न्यूज! जळगावहून मुंबई विमान सेवा लवकरच सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 19:44 IST

जून महिन्यात या सेवेला सुरूवात होण्याची शक्यता आहे.

भूषण श्रीखंडे 

जळगाव : भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मान्यतेनुसार, उडान ५.० योजने अंतर्गत जळगावविमानतळावरून एप्रिल महिन्यात गोवा, हैद्राबाद तसेच २७ मे पासून पुणे विमानसेवा ‘फ्लाय ९१’या विमान कंपनीकडून सुरू आहे. त्यात आता मुंबई-जळगाव अशी विमान सेवा भारत सरकारच्या ‘अलायन्स’ या विमान सेवा कंपनीकडून लवकरच सुरू होणार आहे. याबाबत नागरी उड्डाण मंत्रालयाकडून हिरवा कंदील शुक्रवारी मिळाला असून अंतिम मंजूरीची प्रक्रिया सुरू असल्याने जून महिन्यात या सेवेला सुरूवात होण्याची शक्यता आहे.

जळगावकरांना लगेच गाठता येणार मुंबईजळगावातील अनेकांना मंत्रालयात, व्यापार तसेच अन्य कामानिमित्त मुंबईला रेल्वे किंवा ट्रॅव्हलने जावे लागत असते. परंतू ८ ते १० तास प्रवास करून काम आटोपून पुन्हा लगेच रेल्वे व ट्रॅव्हलने प्रवास करावा लागतो. त्यामुळे मुंबई-जळगाव विमान सेवा सुरू झाल्यावर अर्धा ते एक तासात मुंबई गाठता येणार आहे.

व्यापाऱ्यांसाठी सेवा फायदेशीरजळगावातील व्यापाऱ्यांना बऱ्याचवेळा मुंबईला व्यापार व उद्योग वाढीबाबत जावे लागत असते. परंतू मुंबईच्या प्रवासात अधिक वेळ जात असल्याने व्यापारी वर्गाकडून मुंबई-जळगाव विमान सेवा सुरू करण्याबाबत लोकप्रतिनिधी तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजच्या माध्यमातून मागणी केली जात होती. या मागणीनुसार अलायन्स विमान कंपनीकडून मुंबई-जळगाव विमान सेवेला मान्यता मिळाली असून जून महिन्यात ही विमान सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना या सेवेचा मोठा फायदा मिळणार आहे.

भारतीय नागरी उड्डाण मंत्रालयाने 'अलायन्स एअर' या विमान कंपनीला जळगाव विमानतळावरून मुंबईची विमानसेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे जळगावकरांसाठी व्यापार व उद्योग वाढीच्या दुष्टीकोनातून आनंदाची बाब आहे. गोवा व पुणे पाठोपाठ मुंबईचींही विमानसेवा सुरू होत असल्यामुळे, जळगावच्या हवाई सेवेला विशेष महत्व प्राप्त होणार आहे. - सुनीत कोठारी, अध्यक्ष, नागरी विमान वाहतुक समिती आणि जनसंपर्क समिती औरंगाबाद पर्यटन विकास प्रतिष्ठान.

जळगाव विमानतळावरून आता मुंबई विमान सेवा देखील सुरू होणार आहे. या विमान सेवेसाठी चांगला स्लॉट मिळायला हवा जेणेकरून मुंबईला जाणारे व्यक्ती काम करून लगेच पुन्हा परत येऊ शकतील. - पुरूषोत्तम टावरी, कॅटचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष

टॅग्स :Jalgaonजळगावairplaneविमान