शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सोने-चांदीच्या दराचा विक्रम; चांदी ६०,५०० रुपयांवर; सोनेही बनले ५१ हजारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 22:44 IST

चांदीमध्ये एकाच दिवसात ६,५०० रुपयांनी वाढ; जागतिक बाजारात जाणवतो तुटवडा

जळगाव : जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात चांदीची खरेदी वाढल्याने व आवकही कमी असल्याने चांदीच्या भावात एकाच दिवसात ६,५०० रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे. यामुळे चांदीचे दर थेट ६०,५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. अशाच प्रकारे सोन्याच्या दरामध्येही एक हजार रुपयांनी वाढ होऊन ते ५१ हजार रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहेत. या दोन्ही दरांनी नवीन उच्चांक नोंदविले.

कोरोनाच्या संकटात अनेक उद्योग, व्यवसाय डबघाईस येत असताना त्यांच्यातील गुंतवणूकही घटत आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीकडे कल वाढल्याने या मौल्यवान धातूंची मागणी वाढतच आहे. त्यात अमेरिकन बँकांसह परदेशातील विविध बँकांनी व्याजदर शून्य केल्यानेदेखील सोने-चांदीत गुंतवणूक वाढून जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोने-चांदीच्या भावात वाढ होत आहे.

गेल्या एक-दोन दिवसात जागतिक पातळीवर चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे झपाट्याने भाववाढ होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. सोने-चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत असल्याने नवनवे विक्रम गाठले जात आहेत. यात आता तर एकाच दिवसात थेट ६,५०० रुपयांची वाढ ही सर्वात मोठी वाढ मानली जात आहे.

गेल्या आठवड्यात चांदी ५४ हजार रुपये प्रतिकिलोवर होती. मात्र आता अचानक बुधवारी (दि. २२) त्यामध्ये ६,५०० रुपयांची वाढ होऊन ती ६० हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. दोन आठवड्यांमध्ये चांदीमध्ये तब्बल १० हजार रुपयांची वाढ झाली आहे.सुवर्णनगरी जळगावात ७ ते १३ जुलैदरम्यान कडक लॉकडाऊन करण्यात आले. त्या वेळी लॉकडाऊनपूर्वी चांदी ५०,५०० रुपयांवर होती. त्यानंतर १४ रोजी सुवर्णपेढ्या सुरू होताच चादीच्या भावात ३,५०० रुपयांनी वाढ होऊन ती ५४ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली होती.

सोनेही एक हजाराने वधारले

चांदीसोबतच सोन्याच्याही भावात वाढ झाली असून, सोने एक हजार रुपयांनी वधारून ते ५१ हजार रुपये प्रतितोळा झाले आहे. सोन्यातदेखील दोन आठवड्यांमध्ये १,८०० रुपयांनी वाढ झाली आहे. ७ जुलैच्या लॉकडाऊनपूर्वी सोने ४९,२०० रुपयांवर होते. त्यानंतर १४ रोजी सुवर्णपेढ्या सुरू होताच सोन्याचे भाव ८०० रुपयांनी वाढून ते ५० हजार रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते. आता पुन्हा त्यामध्ये एक हजार रुपयांची वाढ झाली आहे.

जागतिक घडामोडींचा परिणाम होऊन सोने-चांदीत भाववाढ होत आहे. त्यातच जागतिक पातळीवर मोठी खरेदी होऊन बाजारात तुटवडा भासत असल्याने चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. सध्याची स्थिती पाहता भविष्यात भाववाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव शहर सराफ असोसिएशन

टॅग्स :GoldसोनंMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारत