शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
2
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
3
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
4
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
6
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
7
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
8
सह्याद्री प्रकल्पात पट्टेरी 'टी-१' वाघ मुक्कामाला!
9
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
10
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
11
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
12
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
13
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
14
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
15
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
16
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
17
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
18
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
19
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
20
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!

सोने ७० हजारांच्या दिशेने; एकाच दिवसात ९०० रुपयांच्या वाढीने ६९,४०० रुपये भाव

By विजय.सैतवाल | Published: April 01, 2024 4:30 PM

चांदी ७६ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सोने-चांदीतील भाववाढ कायम राहत सोमवार, १ एप्रिल रोजी सोन्याच्या भावात एकाच दिवसात ९०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने ६९ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. एक तोळा सोने घेण्यासाठी आता जीएसटीसह ७१ हजार ४८२ रुपये मोजावे लागणार आहे. चांदीच्याही भावात ५०० रुपयांची वाढ होऊन ती ७६ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली.

२०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्याच्या अर्थात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या भावात वाढ सुरू झाली. ती महिनाअखेरपर्यंत कायम तर राहिलीच शिवाय नवीन आर्थिक वर्षाच्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी, १ एप्रिल रोजी त्यात पुन्हा ९०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे ३१ मार्च रोजी ६८ हजार ५०० रुपयांवर असलेले सोने १ एप्रिल रोजी थेट ६९ हजार ४०० रुपये प्रति तोळा झाले.

दुसरीकडे तीन दिवस ७५ हजार ५०० रुपये प्रति किलोवर स्थिर असलेल्या चांदीच्या भावात सोमवार, १ एप्रिल रोजी ५०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी ७६ हजार रुपये प्रति किलोवर पोहचली आहे.

महिनाभरात सोने ६३०० रुपयांनी वधारले

मार्च महिना हा सोन्यातील मोठ्या भाववाढीचा ठरला. १ मार्च रोजी सोने ६३ हजार १०० रुपये प्रति तोळा होते. त्यात भाववाढ होत जाऊन १ एप्रिलपर्यंत ६ हजार ३०० रुपयांनी वाढ झाली व सोने ६९ हजार ४०० रुपये प्रति तोळा झाले.

भाववाढ कायम राहणार

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याला मोठी मागणी असल्याने त्याचे भाव वाढत आहे. सोन्यात गुंतवणूक वाढत असल्याने ही भाववाढ यापुढेही कायम राहणार आहे. भाव कमी झाले तरी २०० ते ५०० रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात. - अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव सराफ बाजार असोसिएशन.

टॅग्स :Goldसोनं