शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

एकाच दिवसात सोन्याच्या भावात ५०० रुपयांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 12:09 IST

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम

ठळक मुद्दे सुवर्णनगरीत ग्राहकी मात्र कायमएकाच दिवसात मोठी वाढ

विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १३ - अमेरिका व उत्तर कोरियातील तणावाच्या वातावरणामुळे डॉलरचे भाव वधारल्याने त्याचा सोन्याच्याही भावावर परिणाम होत असून सुवर्णनगरी जळगावात एकाच दिवसात सोन्याचे भाव प्रति तोळा ५०० रुपयांनी वाधारले. १० एप्रिल रोजी ३११०० रुपये असणारे सोन्याचे भाव ११ रोजी ३१६०० रुपये झाले व १२ रोजीदेखील ३१६०० रुपयांवर स्थिर राहिले. दरम्यान, सोन्याचे भाव वाढले असले तरी सुवर्णनगरीत सोन्याची ग्राहकी कायम असल्याचे चित्र आहे.सुवर्ण अलंकरांना अनन्य महत्त्व असलेल्या भारतात सोन्याची इतर देशांमधून आयात होत असते. त्यामुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोन्याच्या भावावर मोठा परिणाम होत असतो. त्यानुसार आताही पुन्हा अमेरिका व उत्तर कोरिया यांच्यातील तणावाच्या स्थितीमुळे सोन्याच्या भावावर परिणाम होत आहे. या घडामोडींमुळे अमेरिकी डॉलरचे भाव वाधारून १२ रोजी डॉलरचे भाव ६५.२७ रुपयांवर पोहचले. डॉलरचे भाव वाढल्याने सोन्याचेही भाव वाढण्यास वाव असल्याने दोन दिवसात सोन्याच्या भावांनी चांगलीच मुसंडी मारली.एकाच दिवसात मोठी वाढगेल्या आठवड्यात ५ एप्रिल रोजी ३१००० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात एका दिवसात ६ रोजी १०० रुपयांनी वाढ होऊन ते ३११०० रुपयांवर पोहचले व सलग चार दिवस ते याच भावावर स्थिर राहिले. त्यानंतर ११ एप्रिल रोजी यात थेट ५०० रुपये प्रति तोळ््याने वाढ झाली व सोने ३१६०० रुपयांवर पोहचले. ही वाढ एका दिवसापूरता असू शकते, असे व्यापाऱ्यांना वाटत असताना दुसºया दिवशी १२ रोजीदेखील हे भाव ३१६०० रुपयांवर स्थिर राहिले.ग्राहकी कायमसध्या लग्न सराईमुळे सोन्याला चांगली मागणी असल्याचे चित्र आहे. अचानक सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली असली तरी सुवर्णनगरीत सोन्याची ग्राहकी कायम आहे. सध्या लग्नसराईचीच जास्त खरेदी असल्याने ही खरेदी आवश्यक मानून खरेदीवर परिणाम नसल्याचे सांगितले जात आहे.आणखी भाववाढीची शक्यतापुढील आठवड्यात अक्षयतृतीयेचा मुहूर्त असल्याने या काळात सोन्याची मागणी वाढते, त्यामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा हा परिणाम कायम राहिल्यास सोन्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाºयांनी वर्तविली आहे.अमेरिका व उत्तर कोरिया यांच्यातील तणावाच्या स्थितीचा परिणाम होऊन डॉलरचे भाव वाढले आहे, त्यामुळे सोन्याच्याही भावत वाढ झाली आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.- गौतमचंद लुणिया,अध्यक्ष,जळगाव जिल्हा सराफ असोसिएशन. 

टॅग्स :GoldसोनंJalgaonजळगाव