शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

विक्रम : सोने तब्बल ५५,८००, चांदी ७१ हजारांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 3:23 AM

विक्रम : सोन्यात ९००, तर चांदीत साडेतीन हजारांनी एकाच दिवसात वाढ

जळगाव : सोने-चांदीच्या व्यवहारात सट्टा बाजार तेजीत आल्याने या दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव मोठ्या प्रमाणात वाढून सोन्याने ५५ हजाराचाही टप्पा ओलांडून ते ५५ हजार ८०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहे. अशाच प्रकारे चांदीनेही ७० हजारांचा टप्पा ओलांडून ती ७१ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे अमेरिकन डॉलरचे दर कमी झाले तरी बुधवारी (दि. ५ ) या दोन्ही धातूंचे भाव वाढले आहेत. दरम्यान, या मोठ्या भाववाढीमुळे सुवर्ण व्यावसायिकही चिंतित झाले आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून गेल्या काही महिन्यांपासून सोने-चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. याचा फायदा घेत दलालही सक्रिय होऊन सट्टा बाजार तेजीत आला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून सोने-चांदीत अचानक वाढ तर कधी घसरण होत आहे. चार दिवसांपासून मात्र भाव तेजीच येत असल्याचे चित्र आहे.

भाववाढीचा सलग दुसरा महिनाजुलै महिन्यापासून सोने-चांदीचे भाव वाढतच जाऊन नवनवे विक्रम गाठले गेले. याच महिन्यात सोन्याने ५० हजाराचा टप्पा ओलांडला. त्यानंतर आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनही पुन्हा वाढच होत आहे. यामध्ये१ आॅगस्ट रोजी सोन्याच्या भावात ७०० रुपयांनी वाढ होऊन ते ५४ हजार ७०० रुपयांवर पोहोचले. त्यानंतर सोमवारी सुवर्णबाजार सुरू होताच सोने व चांदी या दोन्हीमध्ये पुन्हा भाववाढ झाली. यात सोन्याच्या भावात २०० रुपयांनी वाढ होऊन ते ५४ हजार ९०० रुपये प्रतितोळा झाले. त्यानंतर बुधवार, ५ आॅगस्ट रोजी त्यात पुन्हा ९०० रुपयांनी वाढ होऊन सोन्याने ५५ हजारांचा टप्पा ओलांडला व ते ५५ हजार ८०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. अशाच प्रकारे १ आॅगस्ट रोजी चांदीतही ५०० रुपयांनी वाढ होऊन ती ६६ हजार ५०० रुपयांवर पोहोचली. बुधवार, ५ आॅगस्ट रोजी तर त्यात थेट साडेतीन हजार रुपये प्रतिकिलोने वाढ होऊन चांदीने ७० हजारांचा टप्पा ओलांडला व ती ७१ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली.अमेरिकन डॉलरचे दर वाढल्यास सोने-चांदीचेही दर वाढतात. मात्र बुधवारी ३८ पैशांनी डॉलरचे दर घसरून ते ७४.९० रुपयांवर आले तरी सोने-चांदीचे भाव वाढले. सट्टाबाजार तेजीत आल्याने ही भाववाढ झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.सुवर्ण व्यावसायिक चिंतितसोने-चांदीतील भाववाढीने सुवर्ण व्यावसायिकही चिंतित झाले आहेत. सोने-चांदीचे भाव वाढत गेल्यास या व्यावसायिकांना जेवढा माल असेल त्यासाठीचा फरक भरावा लागतो. किमान १० टक्के ही रक्कम असते. ज्याच्याकडे १०० किलो सोने घेऊन ठेवलेले असेल तो व्यावसायिक पाच कोटी रुपये कसा भरणार, असा प्रश्न व्यावसायिकांपुढे उभा राहत आहे. सध्या सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने एवढी रक्कम कशी उभी करावी, अशी चिंताही सुवर्ण व्यावसायिकांना सतावत आहे.

टॅग्स :GoldसोनंSilverचांदी