जी.एम. फाउंडेशनला उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 14:41 IST2019-10-24T14:40:00+5:302019-10-24T14:41:43+5:30
विधानसभा निवडणूक : निकाल पाहण्यासाठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते थांबून

जी.एम. फाउंडेशनला उसळली गर्दी
जळगाव : विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरूवारी जाहीर होत असताना भाजपचे निवडणुकीेचे केंद्र जीएम फाऊंडेशन येथे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी उसळली होती़ आत थांबून शेकडो कार्यकर्ते निकाल पाहत होते, तर तेवढीच गर्दी कार्यालयाच्या बाहेर होती.
जळगाव शहर मतदारसंघातून आमदार सुरेश भोळे यांचा विजय जाहीर झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी जल्लोष करून नंतर जीएम फाऊंडशन येथेच निकाल बघितला़ सुरूवातीला पदाधिकाºयांसाठी खुर्च्या टाकण्यात आलेल्या होत्या़ मोठ्या स्क्रिनवर निकाल पाहिला जात होता.