सीए हितेश आगीवाल यांचा गौरव (फोटो आहे)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:17 IST2021-07-28T04:17:17+5:302021-07-28T04:17:17+5:30
जळगाव : दी इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या ‘धन-शोधन निवारण (मनी ...

सीए हितेश आगीवाल यांचा गौरव (फोटो आहे)
जळगाव : दी इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या ‘धन-शोधन निवारण (मनी लाँडरींग विरोधी कायदा) विशेषज्ञ’ या विषयाच्या परीक्षेत जळगाव तालुक्यातील नांद्रे बु. येथील सी. ए. हितेश किशोर आगीवाल यांनी यश मिळविले आहे. यानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
रस्त्यांचा मुद्द्यावर दीपक गुप्ता करणार आंदोलन
जळगाव : शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मनपा प्रशासन व मनपातील सत्ताधाऱ्यांबाबत नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. शहरातील रस्त्यांचा प्रश्नावर बुधवारी सकाळी ११ वाजता सामाजिक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता हे मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या दालनासमोर आंदोलन करून, मनपाने शहरातील रस्त्यांची वाट लावली म्हणून मनपा आयुक्तांना पुष्पगुच्छ देखील देणार आहेत.
सातव्या वेतन आयोगासाठी आंदोलन
जळगाव : मनपा कर्मचाऱ्यांना शासनाने सातवा वेतन आयोग लागू केला आहे. मात्र, मनपाकडून विविध अटी-शर्तीचे कारणे देवून हा आयोग लागू करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने, त्याविरोधात जळगाव महानगर कर्मचारी युनियनतर्फे ९ ऑगस्ट रोजी एक दिवसीय आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती युनियनचे अध्यक्ष जितेंद्र चांगरे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
शिवसेनेकडून वृक्षारोपण
जळगाव : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेकडून शहरातील लेवा भवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, महिला आघाडी प्रमुख शोभा चौधरी आदी उपस्थित होते.