जगात शांतता नांदू दे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 17:29 IST2019-11-10T17:28:50+5:302019-11-10T17:29:11+5:30
ईद-ए-मिलाद : मिरवणुकीने वेधले लक्ष ; हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधवांचा सहभाग

जगात शांतता नांदू दे !
जळगाव- ‘सरकार की आमद मरहबा, मरहबा या मुस्तफा’चा घोषणा देत मिरवणूक काढून मुस्लिम बांधवांकडून रविवारी ईद-ए-मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मिरवणूक हजारोंच्या संख्यने मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदविला होता़
सुन्नी जामा मस्जिद व जुलुसे ईद ए मिलादुन्नबी कमिटी, तमाम आशिकाने रसुल, गुलामाने मुस्तफा यांच्यातर्फे रविवारी सकाळी ९़३० वाजता भिलपुरा परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीनंतर या अल्लाह जगात शांतता व एकात्मता नांदू दे, भारत महासत्ता होऊ दे अशी प्रार्थना मुस्लिम बांधवांतर्फे करण्यात आली.
बºहानपूर येथील मौलाना अबु बकर मिय्या यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक काढण्यात आली. जेरे निगराणी जुलुस समितीचे अध्यक्ष अयाज अली नियाज अली यांनी केली. भिलपुरापासून मिरवणुकीला सुरुवात होऊन घाणेकर चौक, सुभाष चौक, आठवडे बाजार, नेरी नाकामार्गे मुस्लिम कब्रस्थानात येऊन मिरवणुकीची सांगता करण्यात आली. तत्पूर्वी सुभाष चौकात परंपरेनुसार अजान देण्यात आली. त्यानंतर सरकार की आमद मरहबा, नबी की आमद मरहबा या मुस्तफा, जश्ने ईद ए मिलाद उन-नबी जिंदाबाद अशा जोरदार घोषणा मुस्लिम बांधवांकडून देण्यात आल्या़