सुराज्य निर्माण करणाऱ्या मोदींना पुन्हा संधी द्या - पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 22:37 IST2019-04-20T22:36:29+5:302019-04-20T22:37:20+5:30

चोपडा येथे सभा:

Give opportunity to the leader of the state, again - Pankaja Munde | सुराज्य निर्माण करणाऱ्या मोदींना पुन्हा संधी द्या - पंकजा मुंडे

सुराज्य निर्माण करणाऱ्या मोदींना पुन्हा संधी द्या - पंकजा मुंडे


चोपडा - ब्रिटिशांनंतर सत्तर वर्ष गांधी परिवाराने राज्य केले. कॉग्रेस गरिबांच्यासोबत कधीच नव्हते तर ते गरीबी सोबत आहेत. खिचडीचा नेता कोण? हे ठरले नसून यांच्यात एकमेकांत संवाद नाही, अशी टिका राज्याच्या ग्रामीण विकास व महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी चोपडा येथे केली व सुराज्य निर्माण करणाºया मोदींना पुन्हा संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले.
येथील गांधी चौकात भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ शनिवारी रात्री आयोजित सभेत त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, भाजप सर्वांचा पक्ष पण आमच्यावर धर्मांधतेचा शिक्का लावला. कॉग्रेस राष्ट्रवादीने धर्मांना उभे आडवे चिरण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण भागातल्या सुधारणा कॉग्रेसने का नाही केल्या.सैनिकांवर हल्ला झाला.बॉम्बस्फोट झाले त्याला वेळीच जवाब का दिला नाही ? असा सवालही त्यांनी केला. तसेच सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली.
रक्षा खडसे यांनीही यावेळी भाषण केले. यावेळी व्यासपीठावर आमदर चैनसुख संचेती, आमदर रमेश पाटील, माजी आमदार कैलास पाटील, जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे, माजी जि.प.सदस्य शांताराम पाटील, इंदिरा पाटील, नंदकिशोर पाटील, प्रा.सुनिल नेवे, धनंजय पाटील आदी उपस्थित होते.

Web Title: Give opportunity to the leader of the state, again - Pankaja Munde