शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गीतांजली एक्स्प्रेसच्या डब्याला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 13:55 IST

जळगावहून हावड्याकडे जाणाऱ्या गीतांजली एक्स्प्रेसच्या शेवटच्या डब्याला शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देजळगावहून हावड्याकडे जाणाऱ्या गीतांजली एक्स्प्रेसच्या शेवटच्या डब्याला शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याची घटना समोर आली आहे. जळगावजवळ सोमवारी (11 मार्च) दुपारी 12.30 वाजता ही घटना घडली. गेटमनमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

जळगाव - जळगावहून हावड्याकडे जाणाऱ्या गीतांजली एक्स्प्रेसच्या शेवटच्या डब्याला शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याची घटना समोर आली आहे. जळगावजवळ सोमवारी (11 मार्च) दुपारी 12.30 वाजता ही घटना घडली. गेटमनमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

गीतांजली एक्स्प्रेस शिरसोली रेल्वे स्थानकातून जात असताना शेवटच्या डब्याला आग लागली असल्याचे शिरसोली येथील गेटमनच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने वरिष्ठांशी संपर्क साधून आगीची माहिती दिली. त्यानंतर शिरसोलीपासून काही अंतरावर ही गाडी थांबविण्यात आली. अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी पाण्याचा मारा करुन आग विझवण्यात आली आहे. यानंतर आगग्रस्त डबा वेगळा करुन गाडी जळगावकडे रवाना करण्यात आली. 

मनमाड रेल्वेस्थानकावरून मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस रवाना होत असताना याआधीही काही महिन्यांपूर्वी रेल्वे रुळाला तडे गेल्याची बाब वेळीच निदर्शनास आल्याने संभाव्य अपघात टळला होता. गाडी क्रमांक 12859 मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेसला मनमाड रेल्वेस्थानकावर थांबा नाही. गाडी नाशिकहून निघाल्यानंतर थेट भुसावळला थांबते. गाडी मनमाड रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक 2 वरून वेगात रवाना होत असताना स्टेशन मास्तर कार्यालयासमोर मोठा आवाज झाला होता. त्यामुळे फलाटावरील प्रवाशांमधे संभ्रम निर्माण झाला. फलाटावरील विक्रेत्यांनी ही माहिती स्टेशन मास्तर कार्यालयात दिल्यानंतर युद्धपातळीवर रुळ दुरुस्तीचे काम हाती घेऊन अर्ध्या तासात दुरुस्ती करण्यात आली होती. 

टॅग्स :Jalgaonजळगावfireआग