शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

गिरणा परिसरात रब्बी हंगामाचे यंदा तीन-तेरा निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 01:05 IST

चाळीसगाव तालुक्यात पावसाअभावी खरीप हंगामाने मार खाल्ल्यानंतर रब्बी हंगामाचीही आता आशा धूसर होत चालली आहे.

ठळक मुद्देनद्या- नाले कोरडे, विहीरींनी गाठला तळ, पाण्याचे दूर्भिक्षशेतकºयांवर संकटांची मालिका, पैसेवारी कमी लावण्याची मागणी

सायगाव ता. चाळीसगाव :चाळीसगाव तालुक्यातील सायगांव व मन्याड परिसरांतील आणि मन्याड धरणांवर विसंबून असलेल्या २२ गावांमध्ये या वर्षी रब्बी हंगामाचे तिन तेरा वाजणार हे आता निश्चित झाले असून मन्याड धरणात केवळ मृत जलसाठा शिल्लक असल्याने ही परिस्थिती ओढावली आहे.दरम्यान, दरवर्षी नवरात्रोत्सवात रब्बी पिकांची पेरणी केली जाते. परंतु यंदा पुरेसा पाऊस आणि प्रकल्पांमध्ये पाणी नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निराशेचा सूर उमटत असून पहिल्यांदाच शेतकरी वर्ग रब्बी हंगामाला मुकणार आहे. त्यामुळे शेतीच्या बाबतीत भाद्रपदाचे कडक ऊन आणि त्यात पाण्याची कमतरता भासत असल्याने दुष्काळात तेरावा माहिना असाच प्रकार म्हटला जात आहे.आणि शेतकरी झाला हताशयंदा हवामान खात्याने भरलेली हुल आणि इकडे शेतकºयांची उडालेली धांदल त्यात पुढे पावसाने लावलेली हजेरी. त्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी वाटत असतानांच हवामान खात्याने वर्तविलेले पावसाचे भाकीत पूर्णपणे निष्फळ ठरले. त्यातून आशेवर असलेला शेतकरी संकटात सापडला. पावसाळा संपला तरी परिस्थिती सुधारलीच नाही. परिणामी बळीराजा निराशेच्या गर्तेत सापडला असून कधी नव्हे एवढी भयानक परिस्थिती यंदा या परिसरात पाहायला मिळत आहे दुसरीकडे शेतकºयांनी लावलेली खरीपाची पिके पाण्याअभावी पूर्णपणे करपून गेल्याने शेतकरी अत्यंत हताश झाला आहे.कर्ज फेडण्याची चिंतासायगांव व परिसरांतील शेतकºयांनी कुणी सावकारी कर्ज, कुणी बँकेचे कर्ज घेवून आपल्या शेतीचे गणित ठरविले होते. पण यंदा पावसाने पूर्णपणे पाठ फिरविल्याने शेतकरी हताश झाला असून त्यांच्यापुढे एकच प्रश्न आ वासून उभा आहे. तो म्हणजे डोक्यावरील कर्ज फेडायचे कसे? या चिंतेचा घोर त्याला लागला असून सरकारी पातळीवर मात्र या पार्श्वभूमीवर काहीही हालचाल दिसत नसल्याने त्याच्या नैराश्यात भर पडली आहे. दुसरीकडे गुरा ढोरांना जगविण्याचा प्रश्नही त्याच्यापुढे उभा ठाकला आहे. त्यांना वेळेवर चारा पाणी मिळाले नाही तर..त्यामुळे पशुधन ठेवायचे की विकायचे हाही पेच बळीराजापुढे उभा आहे. कारण या वर्षी चाºयाची टंचाई देखील मोठ्या प्रमाणावर भासणार असल्याची स्थिती जवळ जवळ येऊन ठेपली आहे.गिरणा व मन्याड परिसरात पैसेवारी कमी लावण्याची मागणीसायगांव व गिरणा, मन्याड परिसरात या वर्षी पाऊसच झाला नसल्याने जे येणारे उत्पन्न होते ते देखील मोठया प्रमाणावर घटले असून डोक्यावरील कर्जाचा भार वाढणार असल्याने येणारे दिवस काय घेऊन येतात, या चिंतेने शेतकरी पुर्णता खचला आहे.यावर्षीचे तीन आणि पुढील वर्षाचे उन्हाळ्यासह सहा महिने कसे काढता येतील हा मोठा प्रश्न त्याला सतावत आहे. त्यामुळे शासनाने याचा गांभीर्याने विचार करून आणि लोकप्रतिनिधींनी यात जातीने लक्ष घालून पैसेवारी कमी लावण्यात यावी अशी मागणी परिसरांतून होत आहे . 

टॅग्स :droughtदुष्काळ