...अन् HIV कक्षात औषधं घ्यायला आलेली प्रेयसी ८ वर्षांच्या मुलाला घेऊन पळाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 22:34 IST2020-11-18T22:32:24+5:302020-11-18T22:34:23+5:30
जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल

...अन् HIV कक्षात औषधं घ्यायला आलेली प्रेयसी ८ वर्षांच्या मुलाला घेऊन पळाली
जळगाव : प्रियकराच्या वडिलांसोबत जिल्हा रुग्णालयातील एचआयव्ही कक्षात औषधे घ्यायला आलेली प्रेयसी तिच्या आठ वर्षांच्या मुलाला घेऊन गायब झाल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. प्रेयसीबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात हरविल्याची तर मुलाबाबत शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी नगरातील ३० वर्षीय अविवाहित तरुणाने आठ वर्षे वयाचा मुलगा असलेल्या विवाहितेशी संसार थाटला होता. १७ रोजी सकाळी ११ हा तरुण कामावर असताना प्रेयसी प्रियकराच्या वडिलांसोबत जिल्हा रुग्णालयात औषधे घ्यायला गेली होती. एक तास झाला तरी एचआयव्ही कक्षातून ती बाहेर आली नाही, त्यामुळे वडिलांनी घर गाठले असता आठ वर्षाचा मुलगाही गायब झाला होता.