गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांच्या नावावर खरेदी केल्या बीएचआरच्या मालमत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:44 IST2020-12-04T04:44:27+5:302020-12-04T04:44:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जामनेर जि. जळगाव : बीएचआर पतसंस्थेच्या जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील मालमत्ता माजीमंत्री गिरीश महाजन यांनी समर्थक व ...

Girish Mahajan bought BHR's property in the name of the activists | गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांच्या नावावर खरेदी केल्या बीएचआरच्या मालमत्ता

गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांच्या नावावर खरेदी केल्या बीएचआरच्या मालमत्ता

लोकमत न्यूज नेटवर्क

जामनेर जि. जळगाव : बीएचआर पतसंस्थेच्या जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील मालमत्ता माजीमंत्री गिरीश महाजन यांनी समर्थक व कार्यकर्त्यांच्या नावावर खरेदी केल्या असा आरोप जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी बुधवारी निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

ललवाणी यांची सोमवारी पुणे पोलिसांनी चौकशी केली होती. या पाश्वर्श्वभूमीवर त्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, आपल्याकडे असलेली या प्रकरणाशी संबंधित माहिती गुन्हे आर्थिक शाखेला देण्यासाठी पुणे गेलो होतो. मात्र राजकीय विरोधकांनी अफवा पसरविली. माझेवर गुन्हे दाखल करणाऱ्यावर यापुढील काळात खरे गुन्हे दाखल करून त्यांना सळो की पळो करून सोडेन असेही त्यांनी सांगितले.

पतसंस्थेच्या ज्या ठेवीदारांना आत्महत्या कराव्या लागल्या, त्याला हेच जबाबदार असून त्यांच्वावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी आपली मागणी आहे. सुनील झवर याच्याशी आपला संबंध नसल्याचे ते सांगत असले तरी त्यांच्या नावावर पुणे येथे घेतलेली मालमत्ता यांचीच आहे. जामनेर शहरातील पतसंस्थेच्या काही मालमत्तावर दोघांची (गिरीश महाजन व साधना महाजन) नावे लागली आहे, तशी सात बारा उताऱ्यात नोंद असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोट्यवधींच्या मालमत्ता मातीमोल भावाने पावत्यांच्या माध्यमातून खरेदी करून नैतिकतेचा आव त्यांनी आणू नये, वेळ पडल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत मागेपुढे पाहणार नाही असे ललवाणी यांनी सांगितले.

कोट

बीएचआर प्रकरणी माजीमंत्री व आमदार गिरीश महाजन यांचेवर बिनबुडाचे आरोप करणार्या पारस ललवाणी यांनी आधी आपली पत ओळखावी. पुरावे असतील तर ते द्यावे. सरकार तुमच्या पक्षाचे आहे, चौकशी करा, सत्य बाहेर येईल. कुणाचे काय व्यवसाय आहे हे जनतेला माहित असल्याने त्यांच्या आरोपात तथ्य नाही. पोलीसांनी कुणाची चौकशी केली, सिल्लोड पोलीसांनी का अडवीले हे सर्व जाणुन आहे.

- चंद्रकांत बाविस्कर, तालुकाध्यक्ष भाजप, जामनेर

Web Title: Girish Mahajan bought BHR's property in the name of the activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.