शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

गिरीश भाऊ लक्षात ठेवा, मौका सभी को मिलता है; धनंजय मुंडेंचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 22:34 IST

जामनेरमध्ये आज पहिल्यांदा आलो आहे. तसा कधी योग आला नाही. पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभेने जामनेर जाम झालं सभेला परवानगी मिळू नये, जागा मिळू नये यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रयत्न केले.

जामनेर : जामनेरमध्ये आज पहिल्यांदा आलो आहे. तसा कधी योग आला नाही. पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभेने जामनेर जाम झालं सभेला परवानगी मिळू नये, जागा मिळू नये यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी प्रयत्न केले. गिरीश भाऊ आज टाईम तुमचा आहे २०१९ला आमचा टाईम येईल. मौका सबको मिलता है या भाषेत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर त्यांच्याच मतदार संघातल्या सभेत हल्लाबोल केला.

हल्लाबोल यात्रेच्या जामनेर मधील सभा आणि रॅली दरम्यान रस्त्यावरील लाईट बंद करणे, भाजपा समर्थकांना घुसवून सभेत व्यत्यय आणणे असे प्रकार  केले. सभेला परवानगी मिळणार नाही, जागा मिळणार नाही यासाठी मंत्र्यांनी खटाटोपी केल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांनी केल्या. त्यामुळे संतापलेल्या धनंजय मुंडे यांनी भाषणाला उभे राहतात संतप्त रूप धारण करत महाजन यांच्यावर मौका सभी को मिलता है अशा शब्दात हल्लाबोल केला.

ही लोकशाही आहे जर सरकार नीट काम करत नसेल तर त्याविरोधात आवाज बुलंद करणे ही विरोधी पक्षाची जबाबदारी आहे. जर हे आंदोलन कोणाच्या डोळ्यात खुपत असेल तर त्यांनी घरी बसावे.  असे सांगताना देशाचे चौकीदार असताना देशात मोठमोठे घोटाळे समोर येत आहे. असंच चालू राहिले तर देशाच्या नागरिकांना १५ लाख काही मिळणार नाही पण १५ लाखांचे कर्ज प्रत्येक नागरिकांवर होईल अशी भीती व्यक्त केली.

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा म्हणण्याऐवजी आता कुठे आहे महाराष्ट्र माझा असे म्हणावे लागत आहे. भाजप प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार देणार होते आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा म्हणतात तरुणांनी भजी तळावी. उच्च शिक्षित तरुण आता भजी तळणार का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  भाजप एका निवडणुकीत जनतेला फसवू शकते, वारंवार हे शक्य नाही. येत्या निवडणुकीत जनताच यांना यांची जागा दाखवेल. असा विश्वास व्यक्त कऱतानाच जो व्यक्ती २५ वर्षे या भागाचा आमदार आहे तिथे पाण्याचा प्रश्न उद्भवतोय. हा लोकप्रतिनिधी म्हणजे बोंड अळीपेक्षा भयंकर आजार असल्याचा हल्लाबोल केला. ६५ वर्षे आपल्या वडिलधाऱ्यांनी या भाजपला सत्तेपासून का दूर ठेवले हे आज कळत असल्याचे ते म्हणाले. 

यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा. सौ. सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री जयंत पाटील, आ. दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री अरुण गुजराथी, आ. भास्कर जाधव, सौ चित्रा वाघ , संग्राम कोते, संजय गरुड आदी उपस्थित होते.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनDhananjay Mundeधनंजय मुंडे