चाळीसगाव - पेट्रोल-डिझेलचे भाव दररोज वाढत असल्यामुळे इंधनावर वाहन चालविणे अवघड झाले आहे. त्यावर मात करण्यासाठी कुणाल विजयसिंग पाटील व आदित्य अनिल सोनवणे या इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रीक चार्जिंगवर चालणारी सायकल तयार केली. दीड तास चार्जिंग केल्यानंतर २० ते २५ किलोमीटर ही सायकल चालणार आहे. ही सायकल पाहण्यासाठी तालुक्यातील नागरीकांनी गर्दी केली आहे.डॉ.काकासाहेब पूर्णपात्रे विद्यालयातील इयत्ता १० वीचे विद्यार्थी कुणाल पाटील व आदित्य सोनवणे या दोघांचा दोन वर्षांपासून इलेक्ट्रीक सायकल बनविण्याचा संकल्प होता. तो त्यांनी या दिवाळीच्या सुट्टीत पूर्ण करुन यश मिळविले आहे. विशेषत: दिवाळीत कपडे व फटाके न घेता या विद्यार्थ्यांनी वडिलांकडून प्रत्येकी चार हजार रुपये प्रमाणे एकूण आठ हजार रुपये गोळा करुन त्यातून कलकत्ता येथून इलेक्ट्रीक सायकलसाठी स्पेअर पार्ट आॅनलाईनद्वारे मागितले. त्यात प्रामुख्याने गिअर मोटर, कंट्रोलर बॅटरी, एक्सलेटर, हॉर्न, लाईट चार्जिंग इंडीकेटर, इलेक्ट्रीक ब्रेक, ड्युअल व्हील, चार्जिंग पाँर्इंट, बॅटरी, वेल्डींग जोर्इंडर इ.चा समावेश होता.इलेक्ट्रीक सायकल बनविण्याचा विचार इ.८ वी पासून होता. परंतु त्यासाठी आर्थिक खर्च घरच्याकडून मिळत नव्हता. वडिलांना ही बाब सांगितल्यानंतर त्यांचा आमच्यावर विश्वासच नव्हता. यावेळेस दिवाळीच्या सुट्टीत फटाके व कपडे न घेता या अटीवर त्यांनी आम्हाला पैसे दिले. दोघांनी पैसे एकत्रीत करुन वस्तू मागविल्या. सौर उर्जेवरही बॅटरी चार्जिंग होवू शकते अशी माहिती कुणाल पाटील व आदित्य सोनवणे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
पेट्रोल बचत करणारी इलेक्ट्रीक चार्जिंग सायकलची निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 22:02 IST
पेट्रोल-डिझेलचे भाव दररोज वाढत असल्यामुळे इंधनावर वाहन चालविणे अवघड झाले आहे. त्यावर मात करण्यासाठी कुणाल विजयसिंग पाटील व आदित्य अनिल सोनवणे या इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रीक चार्जिंगवर चालणारी सायकल तयार केली.
पेट्रोल बचत करणारी इलेक्ट्रीक चार्जिंग सायकलची निर्मिती
ठळक मुद्देदीड तास चार्जिंगवर २० किलोमिटरचा प्रवास शक्यचाळीसगावच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा प्रयोग झाला यशस्वीदिवाळीत फटाके व कपडे न घेता खरेदी केले साहित्य