शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

हिरवाईने नटले आहे गौताळा अभयारण्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 3:42 PM

संजय सोनार चाळीसगाव: परिसरात झालेल्या चांगल्या पावसामुळे तालुक्याचे पर्यटन वैभव असलेले गौताळा अभयारण्य हिरवेगार झाले आहे. तेथील धवलतीर्थ धबधबा ...

संजय सोनारचाळीसगाव: परिसरात झालेल्या चांगल्या पावसामुळे तालुक्याचे पर्यटन वैभव असलेले गौताळा अभयारण्य हिरवेगार झाले आहे. तेथील धवलतीर्थ धबधबा ओसांडून वाहत आहे. दरवर्षी पर्यटक, भाविक येथील निसर्ग सौदर्याचा सुखद अनुभव घेण्यासाठी ार्दी करतात. मात्र यंदा कोरोनाने पर्यटक तसेच भाविकांच्या वन सफरीच्या इराद्यावर पाणी ओतले गेले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक फैलावू नये म्हणून पाटणासह गौताळाचे दर्शन दुरापास्त झाले आहे.खान्देशचा लोणावळा म्हणून पाटणा देवीचा निसर्गरम्य परीसर प्रसिद्ध आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यापासूूून २० किलोमीटर अंतरावर असलेले गौताळा औट्रमघाट अभयारण्य २६० चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. या अभयारण्यात बिबटया, काळवीट, नीलगाय असे अनेक प्राणी प्रामुख्राने आढळतात तसेच अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती देखील आहे. पाटणदेवी, केदारकुंड धबधब्यासह येथील वन्यजीव हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. विशेषत: शनिवारी, रविवारी रेथे अधिक गर्दी होत असते.पाणटणादेवी येथे वर्षभर येतात भक्तपाटणादेवी हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध देवीचे मंदिर आहे. चाळीसगाव शहरापासून अवघ्या १८ किमी अंतरावर हे शक्तीपीठ निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. वर्षभर येथे भक्तांचा राबता असला तरी नवरात्रीच्या पर्वणीवर अलोट गर्दी होते. पाटणादेवीच्या या मंदिरात आदिशक्ति चंडिकादेवीची मूर्ती आहे. या ठिकाणी पूजा साहित्य आदी विक्रेत्यांना रोगारही उपलब्ध झाला आहे, मात्र सध्या त्यांचा रोजगार हिरावला आहे.खान्देशचा लोणावळागत चार महिन्यापासून कोरोनाने देशभरात धुमाकूळ घातला आहे. त्याचा फटका गौताळा व पाटणादेवीलाही बसला आहे. चार महिन्यापासून पर्यटकांना तसेच भाविकांना गौताळासह पाटणादेवी दर्शन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांसह भाविकांचा मोठा हिरमोड झाला आहे. पावसाळ्यात तर गौताळ्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. खान्देशचे जणू लोणावळच भासते.जळगाव व औरंगाबदच्या सीमेवर आहे अभयारण्यगौताळा अभयारण्य हे औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर आहे. .गौताळा औटराम घाट अभयारण्य कन्नड गावापासून १५ कि.मी अंतरावर आहे तर चाळीसगाव पासून २० कि.मी अंतरावर आहे. औरंगाबादपासून कन्नड ६५ कि.मी अंतरावर आहे. हाच रस्ता पुढे चाळीसगावला जातो. कन्नडहून २ कि.मी पुढे गेल्यानंतर एक फाटा लागतो. या फाटयाने आपण सरळ गौताळा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळ जातो. अभयारण्यात वाहनाने फिरता येते. तळ्याभोवती बांबू, पळस, रानपिंपळ, रानशेवगा, कडुनिंब, चिंच असे वृक्ष आहेत तर तळ्यात पाणडुबा, पाणकोंबडी आणि इतर पक्षी दिसतात. तळ्याशेजारी एक निरीक्षण मनोरा आहे. या मनोऱ्यावरून गौताळा परिसरातील निसर्गाचे सुंदर दर्शन घडते.५४ प्रजातीचे प्राणीअभयारण्यात बिबटया, लांडगे, चितळ, तरस, कोल्हे, काळवीट, रानडुकरे, सांबर, गवे, भेकर यासह इतर ५४ प्रजातींचे प्राणी तर २३० प्रजातींचे पक्षी असल्याची नोंद झाली आहे.विविध स्थळांची भुरळप्रसिद्ध गणितज्ञ भास्कराचार्यांची कुटी, पुरातन मंदिरे, लेणी, महादेव मंदिर, हेमाडपंथी पाटणदेवी मंदिर, केदारकूंड, सीताखोरे आणि धवल तीर्थ धबधबा अशा विविध स्थळांनी पर्यटकांना भूरळ घातल्याने येथे येणाºया पर्यटकांची संख्या मोठी असते.सातमाळ्याचा दिसतो डोंगरगौताळा तलावाच्या डाव्या बाजूला सातमाळ्याचा डोंगर दिसतो. या डोंगरातून नागद नदी उगम पावते. ती उजवीकडे भेळदरीत उतरते. तेथे नदीवर नागद तलाव बांधलेला आहे. सातमाळ्याच्या पलिकडे मांजरमाळ डोंगर दिसतो.