कुंभारी बुद्रुक येथे वृक्षतोड थांबविण्यासाठी वनविभागातर्फे गॅस कनेक्शन वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 16:49 IST2017-11-06T16:44:32+5:302017-11-06T16:49:07+5:30
संयुक्त वनसमितीच्या उपक्रमाचा १२ जणांना लाभ

कुंभारी बुद्रुक येथे वृक्षतोड थांबविण्यासाठी वनविभागातर्फे गॅस कनेक्शन वाटप
आॅनलाईन लोकमत
वाकोद ता. जामनेर,दि.६ : कुंभारी बु।। येथील सयुंक्त वनसमितीतर्फे वृक्षतोड थांबविण्यासाठी १२ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वाटण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या या कार्यक्रमात सरपंच सुरतसिंग जोशी व समाधान धनवट यांनी शासनाच्या गॅस वाटप योजनेची माहिती दिली. गावातील सर्वच गरजूंना वन विभागाकडून गॅस वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी वनसमितीकडे कागदपत्राची पूर्तता करावी, असे यावेळी सांगण्यात आले. वृक्षतोड न करता वन संपत्ती टिकवून ठेवावी व वन विभागाला सहकार्य करण्यात यावे असे आवाहन धनवट यानी केले. सरपंच सुरतसिंग जोशी, वनसमिती अध्यक्ष डिगंबर जोशी, वन विभागाचे बळवंत पाटील, समाधान धनवट, सतीश बिºहाडे, ग्रामसेवक भगवान बोरसे इमरान शेख यांच्या हस्ते गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले.
कुंभारी बु।। गावाला अजिंठा लेणी डोंगररांग असून जंगलात लाकूड तोड होत असल्याने गावातील वनसंयुक्त्त समिती व वन विभागातर्फे अनुसुचित जाती च्या लाभार्थी यांना सवलती च्या दराने २५% रक्कम लाभार्थ्यांची व वन विभागाचे ७५ % अनुदान अशा १२ लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले.
या योजनेचा भीमराव बिºहाडे, चरनदास बिºहाडे, सचिन सुरडकर, नारायण आगळे, देविदास बिºहाडे, अशोक बिºहाडे, रामदास बिºहाडे, सुधाकर साळवे, रवींद्र आगळे, साजन बिºहाडे, आत्माराम पवार, शांताराम पवार यांना गॅस शेगडी, हंडी व साहित्य तोंडापूर येथील उज्वल राम गॅस चे मॅनेजर इमरान जहिर शेख याच्या सहकार्याने गावात घरपोच देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी जोशी, उपसरपंच नवलसिंग जाधव, उत्तम बिºहाडे, अशोक जोशी, मंगलसिंग जाधव, दिलीप तडवी, रावसाहेब मोरे, राजु पाटील, सुधाकर साळवे उपस्थित होते.