गणपती बाप्पा आले घरात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 12:31 IST2019-09-02T12:30:15+5:302019-09-02T12:31:55+5:30

ढोलताशांचा गजर तर गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष

Ganpati Bappa came home! | गणपती बाप्पा आले घरात !

गणपती बाप्पा आले घरात !

जळगाव-ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात सोमवारी शहरात घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात लाडके गणराज विराजमान झाले़ गेल्या काही दिवसांपासून बाप्पाची आतुरतेने वाट पाहत असणारे भक्तगण सोमवारी बाप्पाच्या जयघोषात दंग झाले होते. असंख्य गणेशभक्तांनी शहरातील नवसाचा गणपती, तसेच ईच्छापूर्ती गणेश मंदिरात सकाळपासून बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
श्रीगणेश चतुर्थीनिमित्त बाजारपेठासुध्दा फुलल्या होत्या़ सकाळपासून गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी भक्तांची टॉवर चौक, अंजिठा चौफुली, शिव कॉलनी स्टॉप, पिंप्राळा स्टॉप, प्रभात चौक आदी ठिकाणी प्रचंड गर्दी झालेली होती़ दुसरीकडे कोणी कारमधून, तर कोणी भल्या मोठ्या ट्रकमधून बाप्पाचे आगमन करीत स्वागत केले. डोक्यावर भगवी पट्टी बांधून गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत अनेकांच्या घरोघरी बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. एवढेच नव्हे तर बाप्पाच्या स्थापनेनंतर आपल्या लाडक्या बाप्पासोबत सेल्फी काढून अनेकांनी सकाळपासून आपले व्हॉटस्स्टेटस् अपडेट केले होते़

Web Title: Ganpati Bappa came home!