टोळक्याकडून रखवालदारांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 12:06 IST2017-07-28T12:04:11+5:302017-07-28T12:06:38+5:30

धानवड येथील घटना : मासे चोरीचे कारण

The gang raided the gang | टोळक्याकडून रखवालदारांना मारहाण

टोळक्याकडून रखवालदारांना मारहाण

ठळक मुद्देदहा ते बारा जणांच्या टोळक्याने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण दोन्ही जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मासे चोरुन नेण्याचा प्रय} केला असता वाद

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28 - मासे चोरुन नेण्यास विरोध करणा:या अकील कलीम पिंजारी (वय 32), इरफान शेख (वय 27, दोन्ही रा.मेहरूण, जळगाव ) या दोन्ही रखवालदारांना दहा ते बारा जणांच्या टोळक्याने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी  धानवड शिवारात घडली. दोन्ही जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
जखमींनी दिलेल्या माहितीनुसार, धानवड शिवारातील भवानी मंदिराजवळ सुरेश जावरे यांचा तलाव असून त्यात मासे सोडण्यात आले आहेत. 
जावरे यांनी पिंजारी व इरफान  या दोघांना रखवालदार म्हणून कामाला ठेवले आहे. गुरूवारी सकाळी दहा ते बारा जणांनी पुन्हा तलावातून मासे चोरुन नेण्याचा प्रय} केला असता हा वाद झाला.


 

Web Title: The gang raided the gang