शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाज आरक्षण सभांमध्ये पाकीटमारी करणारी टोळी जेरबंद, मनोज जरांगे पाटलांच्या ताफ्याचा करायचे पाठलाग 

By विलास बारी | Updated: December 6, 2023 23:35 IST

दरम्यान, राज्यभरात ज्या-ज्या ठिकाणी सभा झाली त्या ठिकाणी या गँगनेच चोरी केल्याचा संशय असून अटक केलेल्या पाच जणांकडून अधिक माहिती समोर येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिली.

जळगाव : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्याचा पाठलाग करीत त्यांच्या सभांमधून मोबाईल, पाकीट, सोनपोत चोरी करणाऱ्या मालेगावच्या गँगला जळगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख एक लाख रुपयांसह एक चारचाकी, आठ मोबाईल हस्तगत करण्यात आले. दरम्यान, राज्यभरात ज्या-ज्या ठिकाणी सभा झाली त्या ठिकाणी या गँगनेच चोरी केल्याचा संशय असून अटक केलेल्या पाच जणांकडून अधिक माहिती समोर येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिली.

अटक केलेल्या या गँगविषयी माहिती देण्यासाठी बुधवार, ६ डिसेंबर रोजी संध्याकाळी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांची पत्रकार परिषद झाली. त्या वेळी त्यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी तसेच धुळे येथेही मनोज जरांगे पाटील यांच्या सभा झाल्या. अशा सभांमध्ये चोरट्यांनी मोबाईल, पाकीट, सोनपोत लांबविल्या. यात जळगाव पोलिसांनी अगोदरच्या सभांमधील काही फुटेजचा आधार घेत चोरट्यांचा शोध सुरु केला. त्यानुसार काही जण पोलिसांच्या नजरेस पडले व त्यांनी मालेगाव येथील अबू बक्कर उर्फ अबू कबूतर (३५) या गॅंग प्रमुखासह पाच जणांना अटक केल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

मोठा मुद्देमाल जप्तमालेगाव येथील पाच जणांना अटक केल्यानंतर त्यांची चौकशी केली असता त्यांनी चोऱ्यांची कबुली देत एक लाख ८० हजार रुपये रोख, एक चार चाकी वाहन, आठ मोबाईल त्यांच्याकडून पोलिसांनी हस्तगत केले.

हुबेहुब पेहरावमनोज जरांगे पाटील यांच्या सभा ज्या ठिकाणी व्हायच्या त्या ठिकाणी जाणाऱ्या त्यांच्या ताफ्याच्या मागे ही गँग जात असे. विशेष म्हणजे या ताफ्यातील मंडळींसारखाच पेहराव ही गँग करून गर्दीचा फायदा घेत चोरी करत असे.

राज्यातील चोऱ्याही होणार उघडमनोज जरांगे पाटील यांच्या सभा ज्या-ज्या ठिकाणी झाल्या त्या ठिकाणच्या पोलिस ठाण्यांमध्ये या गँगविषयी माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे राज्यात ज्या-ज्या ठिकाणी सभा झाल्या तेथील ज्या काही चोऱ्या झाल्या असतील त्या उघड होण्यास यामुळे मदत होणार असल्याचा विश्वास पोलिस अधीक्षकांनी व्यक्त केला. 

टॅग्स :ThiefचोरMaratha Reservationमराठा आरक्षणPoliceपोलिस