शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

स्फूर्ती व उत्साह वाढविणारा गणेशोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 20:50 IST

सध्या आपण बाप्पाच्या सोबत आहोत. तसे आपण तब्बल दहा दिवस राहात असूनही आपल्याला किती करू आणि काय करू असे या आवडत्या पाहुण्यासाठी होते.

सध्या आपण बाप्पाच्या सोबत आहोत. तसे आपण तब्बल दहा दिवस राहात असूनही आपल्याला किती करू आणि काय करू असे या आवडत्या पाहुण्यासाठी होते. आपण लहान बालकांसोबत मूर्ती तयार करतो. त्यावेळेस मूर्ती पूर्ण झाल्यावर त्याला रंगवल्यानंतर, त्याचे छायाचित्र काढल्यानंतर त्याला ‘लोकमत’ मध्ये बघितल्यावर मुलांना जो आनंद होतो. बाप्पा त्यानेच खूष होतो ! त्याच्याही चेहऱ्यावर अस्फूट स्मितरेषा सहज दिसू शकते. फुलवाले देहभान विसरून दररोज वेगवेगळी आरास करतात. मंडप सजवणारे तो उंच-उंच नेतात, त्यात रंगबिरंगी कनाती बांधतात आणि बाप्पाचे घर सजवताना आपले घरदार विसरून जातात. ढोल-ताशा, लेझीम यांची पथके असे काही वाजवतात की त्याने देहभान हरपायला होते. त्यांचे तर केव्हाच हरपलेले असते. आरत्या, अथर्वशीर्ष, मंत्रपुष्पांजली हे शिस्तीत आणि आरोह अवरोहांसह जेव्हा घरोघरी आणि मंडळात म्हटले जाते तेव्हा गळ्यावर जे संस्कार होतात ते कायमस्वरूपी टिकणारे असतात.नवनवीन आकार, प्रकारात उत्पादने, वस्तू याच सणात बाजारात येतात व ते धडाक्याने विकले जातात. नातेवाईक सुटी घेऊन एकमेकांना भेटतात. मोठे मंगलदायक असे सारे वातावरण बाप्पा सोबत घेऊन येतो. घरे सजतात, दारे सजतात आणि बाप्पा मनात रूजतात! फार मोठे कलाभान वाढवणारी ही देवता, म्हणूनच माझी आवडती आहे.मला आठवते सुमारे ३ वर्षांपूर्वी माझ्याकडे एक बिल्लास आकाराची एक गुळगुळीत पांढरा-शुभ्र कागद असलेली अशी डायरी होती. ती मी ‘कलाभान’ हा शब्द वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक पानावर लिहून संपूर्ण भरून टाकली. एकसारखी अशी त्या शब्दाची कोठेही रचना झाली नाही हा त्या बाप्पाचा प्रसाद होता. आता मला कळते आहे की रेषा हळूहळू मला काढता यायला लागली होती. तिचे भान आले होत, ते मला आधी कधीही नव्हते ! आज बघतो हे आहे की मी उत्तम स्केचिंग करू शकतो !मला ‘मी-माझे’ असे आत्म-प्रशस्तीपवर आपणास सांगायचे नाहीये. याहूनही मोठे चमत्कार ही बुद्धीदात्री आणि कलाप्रेमी देवता आपल्याकडून करवून घेऊ शकते. आपण तो उत्सव साजरा करायला हवा.वैयक्तिक, सामूहिक भक्ती त्याची करायला हवी. माझे शहर त्या बाबतीत सुदैवी आहे. एक देशभक्तीचे कवन आहे.‘घडो देशसेवा ऐसी, बुद्धी दे अनंता - देश हिच माता...’ मी आपणास विनंती करतो की, बाप्पा आपले कलाभान वाढवो. ‘घडो देशसेवा ऐसी, बुद्धी दे अनंता !’-प्रदीप रस्से

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवJalgaonजळगाव