शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पा मोरया रे... जळगावच्या गणेशमूर्ती पोहोचल्या स्वित्झर्लंड अन् अमेरिकेतही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 22:18 IST

राजू राणा यांनी सांगितले की, भगवान नारायण राणा यांनी मूर्ती बनविण्यास सुरुवात केली.

जळगाव : शहरातील राणा कुटुंब मोठ्या आकारातील गणेश मूर्ती बनविण्यासाठी ओळखले जाते. ७० वर्षांपासून ते हे काम करीत आहेत. त्यांच्यामुळे जळगावच्या मूर्तिकलेची प्रसिद्धी विदेशात झाली आहे. काही जणांनी दिलेल्या आव्हानातून राणा कुटुंबातील आधीच्या पिढीने जिद्दीने ही कला शिकून घेतली.

राजू राणा यांनी सांगितले की, भगवान नारायण राणा यांनी मूर्ती बनविण्यास सुरुवात केली. त्यांनी भाऊ चंदुलाल राणा यांना प्रोत्साहन दिले. नंतर दोघांनी मिळून हे काम सुरू केले. त्यावेळी मूर्ती बनविण्याची साधने कमी असायची. हँडपम्पने रंग दिला जायचा, तर शेडिंगसाठी काठीला कापूस लावून काम भागविले जायचे. यांचा बैलाचा घाणा होता. ते उसाचा रस विकायचे. जामनेरहून आलेल्या काहीजणांनी एकदा त्यांना तुम्ही काय मूर्ती बनविणार, असे आव्हान दिले. त्या जिद्दीतून राणा कुटुंबातील आधीच्या पिढीने मूर्तिकला शिकून घेतली. काळी, पिवळी माती व इतर घटक एकत्र करून मूर्ती बनवायचा प्रयत्न केला. या कलेत पारंगत होण्यासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली.

आतापर्यंत सर्वांत उंच मूर्ती १८ फुटांचीराणा २० ते २५ वर्षांपूर्वीपर्यंत शाडू मातीच्या मूर्ती बनवीत असत. नंतर पीओपीचा ट्रेंड आला. पीओपीमध्येही बरेच प्रकार आहेत. मूर्ती बनविण्यासाठी जे वापरले जाते ते १० ते १५ दिवसांत विरघळते. आतापर्यंतची सर्वांत उंच मूर्ती १८ फुटांची बनविलेली आहे, असे राजू राणा यांनी सांगितले. त्यांच्याकडील मूर्ती काश्मीर, कन्याकुमारी, राजकोट, जालना, मनमाड रेल्वे स्टेशन, पुणे, नाशिक, विदेशांत स्वित्झर्लंड व अमेरिका या ठिकाणी पाठविण्यात आलेल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :JalgaonजळगावGanpati Festivalगणेशोत्सवGaneshotsavगणेशोत्सव