शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

वरुणराजाचा ‘बाप्पावर’ जलाभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 20:19 IST

‘गणपती बाप्पा’ च्या जयघोषात शुक्रवारी गणेश मूर्तींची स्थापना झाली. त्यात दुपारी ३  वाजेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे  विक्रेत्यांचे हाल  झाले  मात्र  गणेश भक्तांचा उत्साह कायम होता.    

ठळक मुद्दे भरपावसातही निघाल्या  मिरवणूका अजिंठा चौकात मूर्ती विक्रेत्यांच्या स्टॉलमध्ये पाणी घुसरल्याने नुकसानपावसानंतर गडगडले भाव

आॅनलाईन लोकमत,

जळगाव-दि.२५,‘गणपती बाप्पा’ च्या जयघोषात शुक्रवारी गणेश मूर्तींची स्थापना झाली. त्यात दुपारी ३  वाजेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे  विक्रेत्यांचे हाल  झाले  मात्र  गणेश भक्तांचा उत्साह कायम होता.    

 गणेश मूर्ती  घेण्यासाठी सकाळपासूनच  भाविकांनी शहरातील बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती. गुरुवारी दिवसभर  पावसाची रिपरिप होती. शुक्रवारी सकाळी पावसाने थोडी उसंत घेतली.  दुपारी ३  वाजेच्या सुमारास जोरदार  पावसाला सुरुवात झाली.  यामुळे काही वेळ खरेदी मंदावली.  पावसामुळे काही विक्रेत्यांच्या स्टॉलमध्ये पाणी शिरले होते. यामुळे गणेशमूर्ती ठेवण्यासाठी विक्रेत्यांची धावपळ झाली. तर अजिंठा चौकातील काही विक्रेत्यांच्या मंडपात पाणी  शिरल्याने काही गणेश मूर्तींचेही  नुकसान झाले. 

पावसातही गणेश भक्तांचा उत्साह कायमसार्वजनिक  गणेश मंडळाच्या मिरवणुकांना सुरुवात झाल्यानंतर दमदार पावसाने हजेरी लावली अन् गणेश भक्तांच्या उत्साहाला पारावर उरला नाही. गणेश मूर्तीला ताडपत्रीने सुरक्षित झाकून, ढोल-ताशांच्या गजरातच मिरणूका काढण्यात आल्या.  जसा-जसा पावसाचा वेग  वाढत होता, तसतसा गणेश भक्तांचा उत्साह  वाढत होता. भक्तांकडून‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर सारखा सुरु होता. 

पावसानंतर गडगडले भावदुपारी जोरदार पावसानंतर  गणेश मूर्तींचे भाव घसरले. दुपारी १ वाजेपर्यंत ५०० रुपयांना मिळणारी मूर्ती दुपारी ४ वाजता ३०० रुपयांना  मिळत होती. तर १ हजार रुपयाला मिळणारी मूर्ती ७०० ते ८००  रुपयांमध्ये विक्री करण्यात आली. पावसानंतर देखील बाजारपेठांमध्ये भाविकांची गर्दी कायम होती.

शाडू मातीच्या गणेश मूर्तींचा तुटवडाशाडू  मातीच्या  पर्यावरणपूरक गणेश मूर्तींबाबत व्यापक जनजागृती झाल्यामुळे  गणेश भक्तांकडून  शाडू मातीच्या गणेश मूर्तींनाच प्राधान्य देण्यात आले. मात्र टॉवर चौक, अजिंठा चौक परिसरात शाडू मातीच्या मूर्तींचा  तुटवडा  दिसून आला.  अनेक  विक्रेत्यांकडे या मूर्ती उपलब्ध नव्हत्या, त्यामुळे गणेश भक्तांना इच्छा असूनही नाईलाजास्तव प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती खरेदी कराव्या लागल्या.