गांधीपुरा वि. का. सोसायटी अध्यक्षपदी ताराचंद मराठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:12 IST2021-06-21T04:12:36+5:302021-06-21T04:12:36+5:30

एरंडोल : येथील गांधीपुरा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदाची गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक होऊन विजयी उमेदवार ताराचंद दशरथ ...

Gandhipura Vs. Of Tarachand Marathe as the President of the Society | गांधीपुरा वि. का. सोसायटी अध्यक्षपदी ताराचंद मराठे

गांधीपुरा वि. का. सोसायटी अध्यक्षपदी ताराचंद मराठे

एरंडोल : येथील गांधीपुरा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदाची गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक होऊन विजयी उमेदवार ताराचंद दशरथ मराठे यांना १० मते मिळाली, तर पराभूत उमेदवार विजय रामदास नाईक यांना दोन मतांवर समाधान मानावे लागले. उपाध्यक्षपदी प्रतिभा वासुदेव वंजारी यांची एकमताने निवड करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी संजय डी. पाटील यांनी काम पाहिले, तर संस्थेचे सचिव रामकृष्ण गायकवाड यांनी त्यांना सहकार्य केले.

निवड जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी बन्सीलाल लोहार, नथ्थू चौधरी, दशरथ चौधरी, अशोक साळी, मदन भावसार, धनंजय खैरनार, सुभाषआप्पा वंजारी, नानाभाऊ बडगुजर, चिंतामण पाटील, सुनील चौधरी, ईश्वरभाऊ बिऱ्हाडे, प्रवीण पाटील, वासुदेव वंजारी, शेखर पाटील, सोसायटीचे स्वस्त धान्य वितरक ज्ञानेश्वर घुगे, आदी उपस्थित होते.

Web Title: Gandhipura Vs. Of Tarachand Marathe as the President of the Society