गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:23 IST2021-09-10T04:23:01+5:302021-09-10T04:23:01+5:30
जळगाव : महात्मा गांधीजींच्या १५३व्या जयंतीनिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय पातळीवरील एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजिण्यात आलेली आहे. यासाठी ...

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे
जळगाव : महात्मा गांधीजींच्या १५३व्या जयंतीनिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय पातळीवरील एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजिण्यात आलेली आहे. यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत निःशुल्क नोंदणी व २० सप्टेंबरपर्यंत आपले व्हिडीओ पाठविणे आवश्यक आहे. विजेते व पारितोषिक वितरण २ ऑक्टोबरला ऑनलाइन पद्धतीने होणार आहे, असे स्पर्धेचे आयोजक गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे कळविले आहे.
दोन गटासाठी भरघोस रोख पारितोषिके
५ ते १० वी इयत्तेतील आणि ११वी ते खुला गट अशा दोन गटांतील स्पर्धेसाठी आयोजकांनी भरघोस अशी रोख पारितोषिके ठेवलेली आहेत. पहिल्या ५ ते १० गटासाठी प्रथम - १५०००, द्वितीय - ११०००, तृतीय - ७०००, आणि दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी ५००० रुपये अशी पारितोषिके आहेत. दुसऱ्या गटासाठी विजयी पहिल्या तीन स्पर्धकांना अनुक्रमे २१००० (प्रथम), १५००० (द्वितीय), १०००० (तृतीय) आणि प्रत्येकी ५ हजार रुपयांचे दोन उत्तेजनार्थ रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. शिवाय प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्रदेखील देणार आहे.
या स्पर्धेसाठी गांधीजींचे जीवन, व्यक्तिमत्त्व, विचार, तत्त्व, कार्य, प्रेरक प्रसंग तसेच गांधीजींच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून एकपात्री नाट्य बनवू शकतात. इंग्रजी, हिंदी किंवा मराठीपैकी कोणत्याही एका भाषेत स्वतंत्र स्क्रिप्ट लेखन असावे. स्पर्धेसाठी नोंदणी व व्हिडीओ सादर करण्यासाठी http://www.gandhifoundation.net/GRF_EVT2021/login.php लिंक दिलेली आहे. स्पर्धेसाठी १५ सप्टेंबरपर्यंत निःशुल्क नोंदणी करून स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे करण्यात आलेले आहे. (वा.प्र.)