‘गेम आॅफ थ्रोन्स... २०१९’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:04 PM2019-05-25T12:04:12+5:302019-05-25T12:04:24+5:30

गेम आॅफ थ्रोन्स’ ही केवळ एक परदेशी मालिका आहे असं नव्हे. तो एक असा खेळ आहे, जो इतिहासात अनेकदा, ...

'Game of Thrones ... 2019' | ‘गेम आॅफ थ्रोन्स... २०१९’

‘गेम आॅफ थ्रोन्स... २०१९’

Next

गेम आॅफ थ्रोन्स’ ही केवळ एक परदेशी मालिका आहे असं नव्हे. तो एक असा खेळ आहे, जो इतिहासात अनेकदा, अनेक ठिकाणी, अनेकांनी प्रत्यक्ष खेळला आहे. आणि पडद्यावर दिसतो तेवढाच तो खेळ प्रत्यक्षातही धूर्त आणि निर्मम आहे. कालापरत्वे शस्त्रे बदलली.. पूर्वी तलवार होती, मग मतपत्रिका आली; आता ईव्हीएम आहे. ‘जी ओ टी’ तोच! हा 'गेम' आता लोकशाहीचा एक अपरिहार्य भाग आहे. एक डाव खेळण्याची संधी आपल्याला, सर्व मतदारांना कधीतरी मिळते. भारतात २०१९ चा 'सीझन' कालच संपला .....
या निवडणुकीचं वर्णन बहुतेकांनी 'वेगळी' असं केलंय. तशी प्रत्येकच निवडणूक आधीपेक्षा वेगळी असतेच. मग या निवडणुकीचं सामान्य मतदारासाठी असलेलं वेगळेपण कोणतं? मतदार म्हणून मला जाणवलेल्या गोष्टी अशा ....
पहिली गोष्ट म्हणजे, सोशल मीडियाचा झालेला प्रचंड वापर. उमेदवारांचा मतदारांशी किंवा मतदारांचा एकमेकांशी संपर्क या माध्यमांतून सतत होत राहिला. त्यामुळे मतदारांच्या मनात नक्की काय आहे, याचा अंदाज खरं तर कोणीच बांधू शकले नाही.
सोशल मीडियावर कोणाच्याही बाजूने आणि विरोधातही इतक्या ढिगाने पोस्ट असायच्या, की त्या आधारे कसलाही निष्कर्ष निघू शकत नव्हता. आताही, लागलेल्या निकालाचं 'विश्लेषण' सगळ्यात जास्त फेसबुक अन ट्वीटरवरच सुरू आहे. दुसरं - या निवडणुकीच्या प्रचारात वैयक्तिक टीकेची पातळी 'न भूतो...' घसरली हा सगळ्यांचाच आक्षेप आहे. पण अर्थातच, प्रत्येकाच्या मते विरोधी विचारसरणीच्या लोकांनीच ही पातळी सोडली.
आपापले नेते सगळ्यांनाच 'गुणाची बाळं' वाटतात. पण परस्पर चिखलफेकीचा परिणाम असा झाला की कित्येक नेत्यांच्या घरापर्यंत आणि कुटुंबीयांपर्यंत तो चिखल पोहोचला. यात उत्साही नेटकऱ्यांचे योगदानही फार मोठे आहे. या सगळ्यापेक्षा खेदजनक बाब अशी की, आपल्या चुका, पराभव हे कोणी मान्यच करत नाही. उलट त्याचं समर्थन करताना सगळे दिसतात. मोदी या एका व्यक्तीला हटवणे हा एककलमी कार्यक्रम घेऊन विरोधी पक्ष चालला. हे लोकांना आवडेल, असं त्यांनी गृहित धरलं.. किंबहुना, आवडलंच पाहिजे ही उर्मट अपेक्षा ठेवली. त्याचे परिणाम निकालात दिसले. पण, गंमत म्हणजे अजूनही अनेक नेते, प्रवक्ते आणि हो, पत्रकारही बेदरकारपणे टी.व्ही. वर सांगतात की या सरकारचे अपयश लोकांच्या लक्षात आलेलं नाही. काही दिवसांत याचे परिणाम देशाला भोगावे लागणार आहेत.?..वगैरे. या देशातल्या मतदाराला अक्कल नाही का? साºया देशाने एकमुखाने दिलेला जनादेश बिनकामाचा आहे? एका पक्षाला सत्ता दिली तर 'प्रगल्भ लोकशाही' आणि त्यांनीच दुसºया पक्षाला दिली तर 'दुर्दैवी निर्णय!' वा रे विचारवंत! काही 'घटनेच्या संरक्षकांनी' तर आमचे नेते निवडून आले नाहीत तर हिंसाचार अटळ आहे ही निलाजरी धमकी दिली. याचा अर्थ स्पष्ट आहे. या लोकांचा प्रत्यक्षात लोकशाहीवर विश्वासच नाहीये. एका अशाच माजी पत्रकाराने तर आज 'दारावर गेल्यासारखी' पोस्ट टाकलीय की तो या ( दु:खद?) प्रसंगी अल्पसंख्य बांधवांसोबत आहे ! या बौद्धिक दहशतवाद्यांची आपल्यासारख्या सामान्य माणसांबद्दलची तुच्छता या निवडणुकीत प्रकर्षाने दिसून आली, हे एक वैशिष्ट्य आहे.
निवडून आलेल्या उमेदवारांचं, पक्षाचं निर्भेळ अभिनंदन करणं आणि जनादेश स्वीकारणं, ही आता कालबाह्य गोष्ट झालीय. हे चांगलं का वाईट, ते तुम्हीच ठरवा!
प्रत्येकाच्या मते विरोधी विचारसरणीच्या लोकांनीच ही पातळी सोडली. आपापले नेते सगळ्यांनाच 'गुणाची बाळं' वाटतात. पण परस्पर चिखलफेकीचा परिणाम असा झाला की कित्येक नेत्यांच्या घरापर्यंत आणि कुटुंबीयांपर्यंत तो चिखल पोहोचला. यात उत्साही नेटकऱ्यांचे योगदानही फार मोठे आहे.
अ‍ॅड.सुशील अत्रे, (वरिष्ठ फौजदारी वकील)

Web Title: 'Game of Thrones ... 2019'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव