शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

मक्यातील गयभू‘दादा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 22:29 IST

आॅनलाईन लोकमत, दि़ ११, जळगाव - आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकलग्न, ता़ धरणगाव येथील गंगाधर पाटील (गयभूदादा) मुलाच्या मदतीने शेतीमध्ये मका पिकाचे विक्रमी उत्पादन घेत आहेत़ यासाठी ते ठिबक सिंचनातून फर्टिगेशन तंत्र वापरत आहेत़ तसेच पाण्याचा संतुलित वापर करीत आहेत़ मका हे तिन्ही हंगामात येणारे पीक आहे. राज्यात मका पिकाचे ...

ठळक मुद्देआधुनिक तंत्रज्ञानाचा केला वापरफर्टिगेशन तंत्राने झाला फायदासिंचनावर मका लागवड

आॅनलाईन लोकमत, दि़ ११, जळगाव - आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकलग्न, ता़ धरणगाव येथील गंगाधर पाटील (गयभूदादा) मुलाच्या मदतीने शेतीमध्ये मका पिकाचे विक्रमी उत्पादन घेत आहेत़ यासाठी ते ठिबक सिंचनातून फर्टिगेशन तंत्र वापरत आहेत़ तसेच पाण्याचा संतुलित वापर करीत आहेत़ मका हे तिन्ही हंगामात येणारे पीक आहे. राज्यात मका पिकाचे क्षेत्र दरवर्षी वाढत आहे. मक्याचा उपयोग पशुखाद्य, पोल्ट्री खाद्य, इथेनॉल, स्टार्च करण्यासाठी वाढत आहे. राज्यात मका प्रामुख्याने औरंगाबाद, जालना, जळगाव, धुळे, वाशिम, बुलडाणा, अकोला, अहमदनगर, नंदुरबार, परभणी, बीड, नांदेड जिल्ह्यांमध्ये घेतले जाते. बहुतांश मका खरीप हंगामात घेतला जाते. मात्र सिंचनाची व्यवस्था नसल्याने उत्पादकतेवर परिणाम दिसून येतो. रब्बी हंगामातील मका ठिबक सिंचन पद्धतीखाली घेतले जाते. उत्पादन जास्त मिळते.ठिबक सिंचनाचा वापर केल्याने पिकांचे उत्पादन वाढते, पाण्याची बचत होते तसेच कमी पाण्यात, कमी विजेत, कमी वेळेत अधिक क्षेत्र लागवडीखाली आणता येते हे शेतकºयांच्या लक्षात आलेले आहे. त्यामुळेच शेतकरी ठिबक सिंचन तंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर करून लागले आहेत. पीकनिहीय प्रचार मोहीमसुद्धा राबवित आहेत़ठिबक सिंचनवरील मका लागवडीआधी जमिनीची पूर्वमशागत करून रोटोव्हेटरने जमीन भुसभुशीत करून घेतली. नंतर ठिबक सिंचनाच्या इनलाईन नळ्या पसरवून घेतल्या. ठिबकच्या दोन नळ्यामध्ये अंतर ५ फूट ठेवले. मका लागवडीपूर्वी रासायनिक खतांचा बेसल डोस दिला.यात १०:२६:२६ ची एक बॅग, डी.ए.पी.ची एक बॅग, युरिया - २५ किलो, पोटॅश -२५ किलो, मॅग्नेशियम सल्फेट -१५ किलो, झिंक सल्फेट -५ किलो एकरी मातीमध्ये चांगले मिसळून दिले. मक्याच्या सुधारित वाणाच्या बियाण्याची टोकन पद्धतीने लागवड केली. ठिबकच्या नळीच्या दोन्ही बाजूस १५ से.मी. अंतरावर बियाणे लावले. म्हणजेच मक्याच्या दोन ओळीमध्ये ३० से.मी. अंतर ठेवले. व दोन मक्याच्या झाडामध्ये २० से.मी. अंतर ठेवले. सिंचनासाठी दादाकडे ३ विहिरी व १ बोअरवेल आहे. गिरणा नदीवर बांधलेल्या कांताई बंधाºयाच्या पाझराचा चांगला फायदा ह्या परिसरातील गावांमध्ये होत आहे, असे दादा आवर्जून सांगतात. ते आपल्या शेतीमध्ये ठिबक आणि स्प्रिंकलरचा वापर करतात. त्यांनी मक्यासाठी टर्बोस्लिम, २ ड्रिपरमधील अंतर ५० सेमी. आणि चार ली. प्रती तास ड्रीपरचा वापर केला. सिंचनासाठी विहिराचे पाणी असल्याने त्यांनी स्क्रिन फिल्टर बसविले आहे. विद्राव्य खते देण्यासाठी व्हेंच्युरी बसविली आहे. ठिबक सिंचनाने जमीन वाफसा अवस्थेत राहील एवढेच पाणी दिले. ठिबकवरील मक्याची उत्कृष्ट उगवण झाली. त्यानंतर ठिबकमधून पाण्यात विरघळणारी युरिया, १२:६१:०० पाढरा पोटॅश ठिबकमधून व्हेंच्युरीद्वारे दिली. सूक्ष्म अन्नद्रव्ये झिंक, बोरॉनसुद्धा दिले़ पीक तणविरहित ठेवले़ठिबक वरील मका पिकाचे अर्थशास्त्रजमिनीच्या पूर्वमशागती पासून ते मका काढणीपर्यंत गयभूदादांना ठिबकचा घसारा धरून एकरी २६२८० रुपये खर्च आला. मक्याचे उत्पादन एकरी ५३़४७ क्विंटल एवढे मिळाले. त्याची विक्री १४१५ रुपये प्रती क्विंटल दराने केली़ त्यापासून एकरी ७५६६० रुपये ढोबळ उत्पन्न मिळाले. त्यामधून मका लागवडीचा संपूर्ण खर्च वजा केल्यास ४९३८० रुपये एकरी निव्वळ नफा मिळाला. मोकाट सिंचनावरील मक्यापासून २३८३२ रुपये एकरी नफा झाला होता. कारण ठिबक सिंचनावरील मक्याचे उत्पादन अधिक मिळाल्याने निव्वळ नफाही जास्त मिळाला. ह्या वर्षी सोयाबीन पिकासाठी स्प्रिंकलर व ठिबकचा वापर केला आहे़ याच २८ एकर क्षेत्रावर ते पुन्हा संपूर्ण मका ठिबक सिंचनाखाली लागवड करणार आहे.४मावा आणि अळीच्या नियंत्रणासाठी व बुरशीचे रोग येऊ नये म्हणून बुरशीनाशक आणि कीटकनाशक एकत्रित दोन फवारण्या केल्या. जमीन कायम वाफसा अवस्थेत राहील एवढेच पाणी ठिबकने दिले. ठिबकमधून खते दिल्यावर फक्त ५ ते १० मिनिटे पाणी दिले. गरजेएवढे पाणी व योग्य वेळी खते मिळाल्याने पिकाची वाढ जोमात झाली़ तर पाटपाण्यावरील मक्याची उंची थोडीशी कमी होती व उत्पादनही कमी आले़गयभू दादांचे मनोगतशेतकºयांनी मका पाटपाणी पद्धतीवर लागवडीपेक्षा ठिबक सिंचन पद्धतीवर लागवड करावी. ठिबकमुळे मका पिकास गरजेएवढेच पाणी देता येते. मक्याचे उत्पादन जास्त मिळते. पाणी वापरामध्ये जवळपास निम्मे ५० टक्के बचत होते. खेड्यामध्ये विजेचा मोठा प्रश्न आहे. कधी रात्री मिळते तर कधी दिवसा मिळते, भारनियमनाचा खूपच त्रास होतो. मजूर मिळत नाही, ठिबकमुळे कमी पाण्यात, कमी वेळेत, कमी विजेत जास्त क्षेत्र लागवड करता येते, सिंचन करता येते. ठिबकमुळे काहीच अडचण येत नाही. मक्याच्या सर्व झाडांना एक समान पाणी व एक समान खते ठिबकमधून देता येतात. त्यामुळे मक्याचे विक्रमी उत्पादन मिळते. त्यामुळे येणाºया रब्बी हंगामात शेतकºयांनी पाटपाणी/मोकाट सिंचन पद्धतीवर मक्याची लागवड न करता ठिबक सिंचन पद्धतीवर लागवड करून विक्रमी उत्पादन घ्यावे.- गंगाधर पाटील, शेतकरी़