उपसा सिंचन योजनांसाठी निधी उपलब्ध करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:19 IST2021-08-13T04:19:51+5:302021-08-13T04:19:51+5:30
मुक्ताईनगर : जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनांचा आढावा घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ...

उपसा सिंचन योजनांसाठी निधी उपलब्ध करावा
मुक्ताईनगर : जिल्ह्यातील उपसा सिंचन योजनांचा आढावा घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे केली आहे.
ॲड. खडसे-खेवलकर यांनी गुरुवारी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांची मुंबई येथे भेट घेतली.
या वेळी रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील बोदवड परिसर उपसा सिंचन योजना, कुऱ्हा, वढोदाल इस्लामपूर उपसा सिंचन योजना, मुक्ताई उपसा सिंचन योजना, वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजना या अपूर्ण अवस्थेत असलेल्या उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी तापी खोरे विकास महामंडळ स्थापन केले. या महामंडळाअंतर्गत पूर्णा तापी नदीचे वाहून जाणारे पाणी मुक्ताईनगर बोदवड कुऱ्हा परिसरातील शेतीचे कोरडवाहू क्षेत्र बागायतीखाली येण्यासाठी लिफ्ट इरिगेशनद्वारे उपसून शेतीला देण्यासाठी या महामंडळ अंतर्गत योजनांची मुहूर्तमेढ रोवली गेली. परंतु या उपसा योजनांचे काम पूर्ण होण्यासाठी भरीव निधीची गरज आहे. सिंचन योजनेचे काम निधीअभावी संथ गतीने सुरू आहे.
या वेळी ॲड. रोहिणी खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष जि. प. सदस्य रवींद्र नाना पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष पं. स. सदस्य दीपक पाटील, रावेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील उपस्थित होते.