कु:हाड येथे पाण्यासाठी सरपंचांच्या घरावर मोर्चा

By Admin | Updated: April 14, 2017 11:30 IST2017-04-14T11:30:34+5:302017-04-14T11:30:34+5:30

पाचोरा तालुक्यातील कु:हाड येथे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांनी सरपंच यांच्या घरावर शुक्रवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास मोर्चा आणला.

A: Front on the Sarpanch's house for water at the bone | कु:हाड येथे पाण्यासाठी सरपंचांच्या घरावर मोर्चा

कु:हाड येथे पाण्यासाठी सरपंचांच्या घरावर मोर्चा

 जळगाव,दि.14- पाचोरा तालुक्यातील कु:हाड येथे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांनी सरपंच यांच्या घरावर शुक्रवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास मोर्चा आणला. यावेळी सरपंच व ग्रामस्थांमध्ये वाद होऊन तणाव निर्माण झाला होता.

दहा हजार लोकसंख्य असलेल्या कु:हाड गावात सध्या नियमित पाणीपुरवठा होत नाही. सध्या गावात दहा ते बारा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यातही केवळ 10 ते 15 मिनीटे पाणी येत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना होती. म्हसळा व वाकडी धरणाचे पाणी कु:हाडच्या शेतक:यांनी पळविल्याने गावात टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संतप्त एक हजारांवर ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास सरपंच यांच्या घरावर मोर्चा आणला. यावेळी ग्रामस्थ व नागरिकांमध्ये वाद झाला. काही नागरिक सरपंच यांच्या अंगावर धावून आले. सरपंचांनी गावाला पाणी पुरवठा करण्यास असमर्थ ठरत असल्याने राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे.  त्यानंतर नागरिकांनी आपला मोर्चा ग्रामपंचायतीकडे वळविला.पाण्यावरून सकाळी 10 वाजेर्पयत संघर्ष कायम होता.

Web Title: A: Front on the Sarpanch's house for water at the bone