शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

आम्ही केलेली कामे जनतेच्या समोर, जनता जनार्दनच योग्य निर्णय घेईल - सुरेशदादा जैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 12:43 IST

विकासाचा रुतलेला गाडा गतिमान करणार

ठळक मुद्देवर्षभरात कर्जमुक्ती ही दिशाभूलविकासासाठी शासनाकडून निधी मिळावा यासाठी धडपड

जळगाव : नागरिकांच्या व्यापक हिताने केलेल्या कार्यात मला कारागृहात जावे लागले. तेथे आयुष्याची साडेचार वर्षे मी घालवली. हे सारे गरज नसताना घडले, याचे शल्य माझ्या मनात आहे. प्रामाणिक हेतूने जनसेवा करूनही कारागृहात जावे लागले, हे सत्य मी स्वीकारले आहे. म्हणून मी जळगावकरांपासून लांब पळून जाणार नाही. ‘सत्तेपुढे शहाणपण चालत नाही’ हे जरी खरे असले तरी ‘सत्तेशिवाय शहाणपण व्यवहारात आणले जात नाही’, या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. म्हणूनच पुन्हा जळगावकरांच्या समोर विकासाचा वसा घेऊन आम्ही या निवडणुकीत शिवसेनेच्या विजयाचा कौल मागतो आहोत. आम्ही केलेली कामे जनतेच्या समोर आहेत. जनता जनार्दन योग्य निर्णय घेईल, यात माझ्या मनात कोणतीही शंका नसल्याचा विश्वास शिवसेनेचे नेते, माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी व्यक्त केला. मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची भूमिका जाणून घेतली असता सुरेशदादा यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.प्रश्न- एका वर्षात मनपा कर्जमुक्त करून शहराचा विकास करणार, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणतात, याबाबत काय सांगणार?सुरेशदादा : हुडकोकडून मनपाने २००१ मध्ये ११० कोटींचे कर्ज घेतले. त्याची व्याजासह फेडही केली. साधारणत: ३०० कोटींची फेड तत्कालीन नगरपालिका व मनपाने केली. असे असतानाही हुडको म्हणते, मनपाकडे घेणी आहे. अशा प्रकारच्या आकारणीला मनपाने रितसर विरोध केला आहे. दरम्यान, तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांच्या कार्यकाळात ‘डीआरटी’त मनपा प्रशासनाने आपली बाजू न मांडल्याने ‘एक्स पार्टी’ निकाल दिला आहे. आपण पुन्हा न्यायालयात बाजू मांडू. नैसर्गिक न्यायतत्त्वाचा विचार करता आमची बाजू ग्राह्य मानली जाईल हा विश्वास आहे. हा विषय न्यायालयात असल्याने वर्षभरात मनपा कर्जमुक्त करू असे जर कुणी म्हणत असेल तर मला संयुक्तिक वाटत नाही. मनपाची निवडणूक असल्याने अशा घोषणा होणे स्वाभाविक आहे.प्रश्न- न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही तसेच शासनाने अधिनियमात बदल करूनही गाळ्यांचा प्रश्न मार्गी लागला नाही, याबाबत काय सांगणार?सुरेशदादा- शहरातील गाळ्यांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी खान्देश विकास आघाडीने खूप प्रयत्न केले. वेळोवेळी मनपाने १६ विविध ठरावही केले. जेणेकरून गाळेधारकांना न्याय मिळेल आणि गाळ्यांच्या उत्पन्नातून जळगाव शहराचा विकास होईल. तसेच न्यायालयानेही गाळ्यांबाबत जुलै २०१७ मध्ये स्पष्ट आदेश दिला.न्यायालयाच्या आदेशानंतर तब्बल ११ महिने मनपा प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. वास्तविक न्यायालयाच्या आदेशानंतर गाळ्यांबाबत कार्यवाही करण्यास कोणतीही अडचण नव्हती. मात्र मनपा प्रशासन राज्य शासनाच्या दबावाखाली काम करीत असल्याने गाळे कराराचा प्रश्न मार्गी लागू शकला नाही. परिणामी गाळ्यांचे भाडे थकीत असून वसुलीही थांबली आहे. आगामी काळात याबाबत पाठपुरावा करून शहराच्या विकासाचा रुतलेला गाडा पुन्हा गतिमान करण्यात येईल.प्रश्न- शहरातील रस्त्यांची दैना झाली असून वर्षभरात शहर खड्डेमुक्त करू असे आश्वासन भाजपाकडून दिले जात आहे, हे शक्य आहे का?सुरेशदादा- अजिबात नाही. कारण शहरात केंद्र शासनाच्या अमृत या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. पाण्याच्या वितरिका टाकण्यात येत असल्याने रस्ते खोदण्यात येत आहे. त्यामुळे नवीन रस्त्यांची कामे करू नयेत असे राज्य शासनाचेच आदेश आहेत. त्यामुळे इच्छा असूनही रस्त्यांची कामे करू शकत नाही. अमृत योजनेनंतर शहरात भुयारी गटारींचे काम सुरू होईल. त्यासाठी सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. हे काम २ ते ३ वर्ष सुरू राहील. त्यामुळे वर्षभरात शहर खड्डेमुक्त शक्य नाही. निवडणुकांमुळे खड्डेमुक्तचे आश्वासन देऊन जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. सत्ता द्या, आम्ही वर्षभरात विकास करू असे मतदारांना सांगितले जात आहे, मात्र केंद्र व राज्यात भाजपाची सत्ता असताना विकास का केला नाही? गाळे प्रश्न, हुडको प्रश्न, समांतर रस्ते, महामार्गाचे चौपदरीकरण हे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. ते का सोडविले नाही? आता शहराच्या विकासासाठी २०० कोटी आणणार असे आश्वासन दिले जात आहे. आम्हाला २०० कोटी द्या, आम्ही शहराचा विकास करून दाखवितो.प्रश्न - मुख्यमंत्र्यांनी शहराच्या विकासासाठी २५ कोटी दिले, मात्र ते का खर्च होऊ शकले नाहीत, या निधीबाबत नेमका वाद काय?सुरेशदादा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी २५ कोटी दिले. त्यातून भाजपा, खान्देश विकास आघाडी व मनसेला विभागून कामे देण्यात आली. जेणेकरून शहराचा विकास व्हावा व सर्व पक्षांना समान संधी मिळावी. मात्र आमदार सुरेश भोळे यांनी आपल्याला कमी निधी मिळाला म्हणून आक्षेप घेतला. त्याची दखल घेत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर कामांची यादीही तयार झाली. त्यालाही त्यांनी विरोध केला. सतत आडकाठी आणल्याने हा निधी खर्च होऊ शकला नाही. निधी शासन देणार असल्याने मनपा प्रशासनाकडून पाठविण्यात आलेल्या कामांच्या यादीला शासनच मंजुरी देते, त्यामुळे खाविआमुळे निधी खर्च होऊ शकला नाही, असे म्हणणे चुकीचे आहे.प्रश्न - शहराच्या विकासासाठी आमदार निधी देण्याचा प्रयत्न केला तरी त्यास खाविआने विरोध केल्याचा आरोप भाजपाकडून होत आहे, याबाबत काय सांगणार?सुरेशदादा - शहराच्या विकासासाठी शासनाकडून निधी मिळावा यासाठी धडपड सुरू असताना आमदार निधी देत असतील तर विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. खान्देश विकास आघाडीने चार वर्षात आमदारांना निधीसाठी विरोध केल्याचे एक तरी उदाहरण द्यावे. निवडणुकीच्या काळात जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यात येत आहे. मात्र जनता सुज्ञ आहे.प्रश्न : मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नगरसेवकांनी पक्षांतर केले. या आयाराम-गयारामांबाबत काय सांगणार?सुरेशदादा : प्रत्येक निवडणुकीपूर्वी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षांतर करीत असतात. देशात व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने काहींनी भाजपात प्रवेश केला. नाशिक, पुणे, पिंप्री चिंचवड येथेही भाजपाने अनेक विद्यमान नगरसेवकांना त्यांच्या पक्षात घेतले. आयाराम-गयाराम हे उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. सत्ता आमची आली तर पक्षांतर करणारे पुन्हा परत येतील.प्रश्न : अनेक वर्षे सत्ता असताना आपण काय विकास केला, असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे?सुरेशदादा : मोठी व्यापारी संकुले असलेले, संपूर्ण शहारासाठी जलशुद्धीकरण केंद्र, मनपाची १७ मजली प्रशासकीय इमारत असलेले एकमेव शहर, झोपडपट्टीमुक्त शहर, जातीय व सामाजिक संघर्षमुक्त शहर, नागरिकांना पुरेसे पाणी देणारे शहर असा लौकिक आम्ही निर्माण केला आहे. असे असतानाही काय केले असे प्रश्न विचारणाऱ्यांविषयी मला खेद वाटतो.प्रश्न : खडसेही आपल्यावर आरोप करीत आहेत, त्याबाबत काय सांगणार?सुरेशदादा : जलसंपदामंत्री गिरीश महाजन तरी जळगावच्या विकासासाठी २०० कोटी आणू असे म्हणतात, मात्र एकनाथराव खडसे यांनी जळगावच्या विकासासाठी काय केले आहे? पालकमंत्री म्हणूनही खडसेंना संधी मिळाली. असे असतानाही जळगावकरांना काहीच मिळाले नाही. आमच्यावर ते आरोप करतात. मात्र आम्ही दोषी नाही. न्यायालयात याबाबत खटला सुरू आहे. न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य राहील. मनपाच्या प्रत्येक निवडणुकीपूर्वी खडसे हे आरोप करतात, हे जळगावकरांना माहीत आहे. त्यांच्यावरही आरोप झाल्याने त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला व घरी बसावे लागले, हे त्यांनी विसरू नये.भाजपासोबत युती का झाली नाही?भाजपासोबत युती करण्याचा प्रस्ताव आम्ही दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईत युतीची चर्चा झाली. तेही युतीसाठी तयार होते. मात्र त्यानंतर पुढे कोणतीही चर्चा अथवा बोलणी झाली नाही. भाजपाने २८ जागा लढवाव्यात व आम्ही किती जागांवर उमेदवार देणार आहे, याबाबत कोणतीही बोलणी भाजपासोबत झाली नाही. २८ जागांबाबतची माहिती काल्पनिक आहे. युतीचा प्रस्ताव न आल्याने आम्ही स्वबळावर लढण्यासाठी कामाला लागलो.शिवसेना, भाजपा व इतर पक्षांना किती जागा मिळणार?शिवसेना पूर्ण ताकदीनिशी सर्व ७५ जागा लढत आहे. त्यापैकी ४५ जागा शिवसेनेला, तर २७-२८ जागा भाजपाला मिळतील. गतवेळीही खान्देश विकास आघाडीला सर्वाधिक ३३ जागा मिळाल्या होत्या. जनक्रांती व राष्टÑवादीच्या मदतीने सत्ता हाती घेतली होती. या वेळी आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल, कुणाचीही मदत घेण्याची आवश्यकता भासणार नाही. जळगावकर आम्हालाच कौल देतील.सामाजिक सौहार्दता व सुरक्षिततेला महत्त्व दिलेकधीकाळी जात, समाज यांच्या भिंतीत जळगावचा समाज विभागलेला होता. दंगलीचा मोठा इतिहास होता. अशा वातावरणात राजकारण व समाजकारण करीत असताना समाज एकसंघ ठेवण्याचे काम केले. सामाजिक सौहार्दता व सुरक्षितता कायम नांदावी म्हणून प्रयत्न केले. त्यात यश आल्याने शहरात शांतता

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव