शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

काँग्रेस-राष्ट्रवादीचा अमळनेर तहसील कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 7:31 PM

कापसावर पडलेल्या बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानासंदर्भात मंजुर करण्यात आलेले अनुदान हे वस्तूस्थितीला धरून नाही. कृषी अधिकारी आणि तलाठ्यांनी संपूर्ण तालुका जिरायती दाखवला असून या विरोधात सोमवारी काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसतर्फे अमळनेर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देअमळनेर तहसीलदारांना मोर्चेकºयांनी दिले निवेदन तहसीलदारांकडून पंचनाम्यात त्रुटी असल्याची कबुली तहसील कार्यालयात आज संयुक्त बैठक

आॅनलाईन लोकमतअमळनेर, दि.२१ : कापसावर पडलेल्या बोंडअळी संदर्भातील अनुदान हे वस्तुस्थितीला धरून नसून तलाठ्यांनी सर्वच क्षेत्र जिरायती दाखवले असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून योग्य अनुदान मिळण्यासाठी निवेदन देऊन मागणी केली आहेजिल्हा परिषद विश्रामगृहापासून दोन्ही पक्षांनी हा संयुक्त मोर्चा काढला. यावेळी शासनाविरोधी घोषणा देण्यात आल्या. तहसील कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर शिष्टमंडळाने तहसीलदार प्रदीप पाटील यांची भेट घेऊन पंचनाम्यांच्या तफावतीबद्दल तक्रार केली.२०१७- १८ च्या हंगामात खरीप कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी सातबारा उताºयावरील पीक पेºयानुसार अर्ज करावेत असे सूचित केले होते. अधिकाºयांनींही तसेच आदेश दिले होते. मात्र प्रत्यक्ष कृषी अधिकारी, सहायक आणि तलाठी यांच्या संयुक्त अहवालात संपूर्ण अमळनेर तालुका जिरायती दाखवण्यात आला आहे. एकही क्षेत्र बागायती दाखवलेले नाही. मात्र अनेक शेतकºयांनी बागायती कापूस लावलेला होता. परिणामी शेतकºयांना मिळणाºया अनुदानात फार मोठ्या प्रमाणात तोटा होणार आहे. यावेळी मोर्चेकºयासमोर सुभाष पाटील यांनी सांगितले की सर्वप्रथम अमळनेर, मुक्ताईनगर, बोदवड हे तालुके दुष्काळी मंजूर करण्यात आले, नंतर मात्र अमळनेर तालुक्याचे नाव गायब झाले. हे लोकप्रतिनिधी व अधिकाºयांचे अपयश आहे. अनिल शिसोदे म्हणाले की, वस्तुस्थिती प्रमाणे अनुदान मिळत नसेल तर आम्ही घेणार नाहीत. यावेळी तहसीलदार प्रदीप पाटील यांनी सांगितले की, तलाठ्यांना वस्तुस्थिती तसेच सातबारा प्रमाणे पंचनामे करण्यास सांगितले होते. परंतु संपूर्ण तालुका जिरायती दाखवण्यात आला आहे. याची कबुली त्यांनी दिली. त्यावर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ पाटील म्हणाले की, बागायती असतानाही तलाठ्यांनी मोघममध्ये फक्त कापूस पेरा असा उल्लेख केला आहे. त्यामुळे ते जिरायती क्षेत्र धरले जाते. यावर तहसीलदार प्रदीप पाटील यांनी मोर्चेकºयांचे समाधान होण्याकरता जे बागायतदार असतात त्यांच्याकडून शिक्षण कर व रोजगार हमी कर घेतला जातो. मात्र शेतकºयांनी हा मुद्दा खोडत यंदा शिक्षण व रोजगार हमी कर घेतलाच नाही असे सांगून जे लहान बागायतदार आहेत त्यांना हे कर माफ असतात तर असे शेतकरी कसे बागायतदार दाखवले जातील.मोर्चात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, कृउबाचे माजी संचालक धनगर पाटील, अशोक बाजीराव पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पराग पाटील, अ‍ॅड. गिरीश पाटील, संचालक सुरेश पाटील, मुख्तार खाटीक, शेतकी संघाचे माजी अध्यक्ष संजय पाटील, भागवत सूर्यवंशी, पं. स. सदस्य विनोद जाधव , पं. स. सदस्य प्रवीण पाटील, महेश पाटील, संभाजी पाटील, जयवंत शिसोदे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सुरेश पाटील, शिवाजीराव पाटील, विजय पाटील,बाळू पाटील, रणजित पाटील, शरद पाटील, अलिम मुजावर, इम्रान खाटीक, भागवत पाटील हजर होते.तहसील कार्यालयात आज संयुक्त बैठकतहसीलदार प्रदीप पाटील यांनी तांत्रिक दोष लक्षात आल्यावर शेतकº्यांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी कृषी अधिकारी, कृषी सहायक, तलाठी व शेतकºयांच्या शिष्टमंडळातील गोकुळ पाटील, सचिन पाटील, सुभाष पाटील, अनिल शिसोदे, शिवाजी पाटील यांच्यासह शेतकºयांची संयुक्त बैठक २२ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात आयोजित केली आहे. त्यावेळी प्रत्यक्ष चर्चा करून योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी