जामनेर येथे फ्रिजचा स्फोट होऊन १२ लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 13:00 IST2018-02-20T12:58:12+5:302018-02-20T13:00:20+5:30

सुदैवाने जीवीत हानी टळली

Fridge explosion at Jamner | जामनेर येथे फ्रिजचा स्फोट होऊन १२ लाखाचे नुकसान

जामनेर येथे फ्रिजचा स्फोट होऊन १२ लाखाचे नुकसान

ठळक मुद्देएक लाखाची रोकड खाक सोन्या-चांदीचे दागिनेही आगीच्या भक्षस्थानी

आॅनलाईन लोकमत
जामनेर, जि. जळगाव, दि. २० - जामनेर शहरातील माळी गल्लीतील रहिवासी आनंदा पंडित माळी यांच्या घरात फ्रिजचा स्फोट होऊन १२ लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नाही. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.
माळी हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते व मुले शाळेत गेलेले होते तर पत्नी घराबाहेर धुणे धूवत होत्या. त्या वेळी घरातून अचानक धूर येऊ लागले. शेजाºयांनी धाव घेऊन पाहिले असता फ्रिजचा स्फोट झाल्याचे लक्षात आले. यामध्ये घरातील ७० हजार रुपयांचे दागिने, एक लाखाची रोख रक्कम, टि.व्ही., पंखे व इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.

Web Title: Fridge explosion at Jamner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.