शुक्रवारी राहणार महिन्यातील जिल्ह्याचे सर्वाधिक तापमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 01:12 PM2020-02-24T13:12:08+5:302020-02-24T13:12:27+5:30

थंडी ओसरली, उष्णता वाढली : थंडी कमी तरीही तापमान जास्त

Friday's highest temperature for the month | शुक्रवारी राहणार महिन्यातील जिल्ह्याचे सर्वाधिक तापमान

शुक्रवारी राहणार महिन्यातील जिल्ह्याचे सर्वाधिक तापमान

Next

जळगाव : थंड वाऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याने जळगावचे तापमान गेल्या दोन दिवसांपासून वाढले आहे. तापमानाची ही झळ पुढील चार दिवस राहणार आहे. शुक्रवारी दि. २८ रोजी या मोसमातील सर्वाधिक तापमान असेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. रविवारी जळगावचे कमाल तापमान हे ३६ तर किमान तापमान हे १९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
गेल्या आठवड्यात असलेली गारव्याची झुळूक आता कमीकमी होऊ लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जळगावचे तापमान वाढले असून तापमानाचा पारा आता ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. राज्याच्या तुलनेत संपूर्ण राज्यातच उष्णतेची लाट असून पुढील दोन दिवस ही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. हा अंदाज राज्यभरासाठी असला तरी जळगाव जिल्ह्याचे तापमान पुढील दोन दिवसात रविवार इतकेच राहणार आहे.
दरम्यान, एप्रिल, मेमध्ये सर्वाधिक उष्णतेचे चटके बसणाºया जळगावात तापमान अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत २३ फेब्रुवारीला कमी होते. जळगावकरांसाठी ही दिलासादायक बातमी असली तरी तरी पुढील महिन्यापासून मात्र हळूहळू े तापमान वाढणार आहे.
दि. २३ रोजी राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद ही अहमदनगर जिल्ह्यात झाली असून या जिल्ह्याचे कमाल तापमान हे ३८ तर किमान तापमान हे १५ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
त्याखालोखाल सिंधुदूर्ग ३७ अंश, १९ अंश तर रत्नागिरीचे तापमान हे ३६ अंश व किमान तापमान २० अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले आहे. किमान तापमान सर्वात कमी गोंदीया जिल्ह्यात (२० अंश सेल्सिअस) तर सर्वात जास्त डहाणू येथे (२३ अंश सेल्सिअस) येथे नोंदवण्यात आले आहे.
जळगाव शहर हे महाराष्टÑातील सर्वाधिक तापमान नोंदविले जाणारे शहर आहे. मार्च महिन्याला सुरुवातही झाली नाही, तितक्यात आतापासून मे हिटची चाहूल जाणवू लागली आहे.

गेल्यावर्षीपेक्षा यंदा तापमान कमी
यंदा सर्वच ऋतु उशिराने सुरु झाले. त्याप्रमाणे उन्हाळाही उशिराने सुरु होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमान वाढले असले तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचे या दरम्यानचे तापमान कमीच आहे. २३ फेब्रुवारी २०१९ रोजी म्हणजे आजच्याच दिवशी जळगावचे कमाल तापमान ३७ तर किमान तापमान हे १७ अंश सेल्सिअस एवढे होते. यावर्षी मात्र तापमानात थोडी घट आहे.

शुक्रवार ठरणार ‘हॉट’
हवामानाशी संबंधित ‘टाईम अ‍ॅण्ड डेट’ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारीमधील २८ तारखेचा दिवस हा सर्वाधिक ‘हॉट’ असणार आहे. कारण त्यादिवशी कमाल तापमान हे ३७ अंश सेल्सिअस एवढे असणार आहे. त्यानंतर पुढील ७ व ८ मार्च हे दोन दिवस उष्णतेचे राहणार आहेत.

यंदा उन्हाळ्याचे चटके उशिराने बसणार?
हवामानावर अभ्यास करणाºया ‘अ‍ॅक्युवेदर’ या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार जळगाव जिल्ह्याला यंदा उन्हाळ्याचे चटके उशिराने बसणार आहेत. गेल्या वर्षी २८ मार्चला तापमानाची चाळीशी पार केली होती, मात्र यंदा चाळीशी पार करायला ६ ते ९ एप्रिल उजाडणार असल्याचे वृत्त या वेबसाईटने दिले आहे. २८ एप्रिलला यंदा सर्वाधिक म्हणजे ४४ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहणार आहे.

गेल्या दोन वर्षातील तापमान
२३ फेब्रुवारी २०१८
३७ अंश सेल्सिअस, १७ अंश सेल्सिअस
२३ फेब्रुवारी २०१९
३३ अंश सेल्सिअस, १७ अंश सेल्सिअस
२३ फेब्रुवारी २०२०
३६ अंश सेल्सिअस, १९ अंश सेल्सिअस
 

Web Title: Friday's highest temperature for the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.