ब्रेक निकामी झाल्याने मालवाहतूक रिक्षा धडकली घरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:15 IST2021-03-27T04:15:50+5:302021-03-27T04:15:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : विटा वाहून नेणा-या रिक्षाचे अचानक ब्रेक फेल झाले. उतार असल्यामुळे रिक्षा सरळ समोरील घराला ...

Freight rickshaw hit the house due to brake failure | ब्रेक निकामी झाल्याने मालवाहतूक रिक्षा धडकली घरावर

ब्रेक निकामी झाल्याने मालवाहतूक रिक्षा धडकली घरावर

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : विटा वाहून नेणा-या रिक्षाचे अचानक ब्रेक फेल झाले. उतार असल्यामुळे रिक्षा सरळ समोरील घराला जावून धडकली. यात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना समता नगरातील जिजामाता चौकात शुक्रवारी सकाळी ९ वाजता घडली. युवराज बाविस्कर (३२,रा. कोळंबा ता. चोपडा ह.मु. समता नगर) असे मयत मालवाहतूक रिक्षा चालकाचे नाव आहे.

युवराज बाविस्कर हे मुळचे चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील रहिवासी होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते समता नगरात पत्नी व दोन मुलांसह राहत होते. मालवाहतूक रिक्षा चालवून ते कुटूंबियांचा उदरनिर्वाह करायचे. शुक्रवारी सकाळी किरकोळ कामासाठी मालवाहू (एमएच.१९.एस.७१४२) रिक्षा घेवून गेले. रिक्षात विटा भरून समता नगरातील जिजाऊमाता चौकातील उतारावरून येत असताना अचानक ब्रेक निकामी झाले. त्यामुळे बाविस्कर यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि थेट समोरच्या घराला धडक दिली. यात युवराज यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात एकाच्या घराचे वॉलकंपाऊंड पडून नुकसान झाले असून वाहनाचा पुढच्या भागाचा चुराडा झाला होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. मयताच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. घरातील एकुलता एक कमवता व्यक्ती गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Freight rickshaw hit the house due to brake failure