Freezing cold wave will occur throughout the week | आठवडाभरात येणार थंडीची लाट

आठवडाभरात येणार थंडीची लाट

जळगाव : उत्तर भारतातील जम्मू-काश्मिर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या राज्यांमध्ये बर्फवृष्टी सुरु झाल्यामुळे राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे चार दिवसांपासून किमान तापमानात कमालीची घट झाली आहे. सोमवारी किमान तापमान १५ अंशावर आले होते. आगामी काही दिवसात थंडीचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
यंदा जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना चांगले पाणी आहे. त्यात आता उत्तर भारतात देखील बर्फवृष्टी सुरु झाल्यामुळे थंडीची चाहुल लागली आहे. जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याचा पहिल्या आठवड्यापासूनच गुलाबी थंडी अनुभवयास मिळते. यंदा अवकाळी पावसामुळे थंडी लांबली होती. मात्र, शुक्रवारपासून थंडीने जोर धरला असून, रात्री ७ वाजेनंतर थंड वाºयांमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. हवामान विभागाकडून आधीच यंदा थंडीचा जोर चांगला राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
महाबळेश्वर, गोंदीया व जळगाव राज्यात थंड राज्यात सोमवारी सर्वात कमी पाºयाची नोंद गोंदीया येथे झाली असून, सोमवारी गोंदीयाचे किमान तापमान १५.३ अंश इतके होते. त्याखालोखाल महाबळेश्वर व जळगावचा किमान तापमान १५ अंश इतके खाली घसरले असल्याची नोंद भारतीय हवामान खात्याचा संकेतस्थळावर होती. तापमानात घट होताच धुक्याचेही प्रमाण वाढले असून, सकाळी ७ वाजेपर्यंत धुक्याची चादर पसरलेली पहायला मिळत आहे.
थंडीचा तडाखा वाढणार
आठवड्याभरात उत्तरेकडून येणाºया थंड वाºयांचे प्रमाण कायम राहणार आहे. त्यामुळे शहराच्या पारा आणखीन घसरण्याचा अंदाज आहे. जळगावचे किमान तापमान १५ अंशापेक्षा खाली घसरण्याचा अंदाज आहे. तसेच वाºयांचा वेग देखील १३ किमी प्रतितासपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असल्याने त्यामुळे थंडीचा तडाखा वाढण्याची शक्यता आहे. थंडीची चाहूल लागल्याने शहरात स्वेटर विक्रीसाठी तिबेटी बांधव देखील झाले आहेत.
हिवाळ्यात नागरिक आपल्या आरोग्याची काळजी घेण्यावर अधिक भर देतात. तसेच हिवाळा आरोग्यासाठी हितवर्धक असतो. तापामानात घट होत असल्याने सकाळी व्यायाम करणाºयांचा संख्येत देखील वाढ झालेली दिसून येत आहे.

Web Title:  Freezing cold wave will occur throughout the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.