भुसावळसह मनमाड,अकोला रेल्वे स्थानकांवर मोफत ‘वायफाय’सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 18:24 IST2017-11-29T18:19:38+5:302017-11-29T18:24:22+5:30
भुसावळ रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांची माहिती

भुसावळसह मनमाड,अकोला रेल्वे स्थानकांवर मोफत ‘वायफाय’सेवा
आॅनलाईन लोकमत
भुसावळ,दि.२९ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील अत्यंत महत्त्वाच्या अशा भुसावळ रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने अत्याधुनिक अशी मोफत ‘वायफाय’ सेवा उपलब्ध करुन दिली आहे, अशी माहिती भुसावळ रेल्वे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी ‘लोकमत’ला दिली.
दरम्यान, भुसावळसह विभागातील मनमाड, अकोला आणि बडनेरा या रेल्वे स्थानकांवरही मोफत वायफाय सेवा सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय लवकरच भुसावळ रेल्वे विभागातील खंडवा आणि नाशिक या ए-वन श्रेणीतील स्थानकावर मोफत वायफाय सेवा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.
मोफत वायफाय सेवेमुळे प्रवाशांना इंटरनेटसह महत्त्वपूर्ण माहिती शोधता येणार आहे.