भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे मोफत दंत तपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 16:36 IST2018-11-28T16:35:23+5:302018-11-28T16:36:58+5:30

भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे विविध कार्यकारी सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने मोफत दंत तपासणी शिबिर घेण्यात आले. १२० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

Free Dental Check-up Camp at Sakegaon, Bhusaval taluka | भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे मोफत दंत तपासणी शिबिर

भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे मोफत दंत तपासणी शिबिर

ठळक मुद्देविविध कार्यकारी सहकारी संस्था व ग्राम पंचायतीचा स्तुत्य उपक्रम१२० नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ

भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे विविध कार्यकारी सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने मोफत दंत तपासणी शिबिर घेण्यात आले. १२० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
संस्थेच्या चेअरमन शालिनी पवार, व्हाईस चेअरमन इंदुबाई पवार, सचिव सुभाष पाटील यांनी गावातील नागरिकांना मोफत दंत चिकिस्ता व्हावी या हेतूने ग्रामपंचायत कार्यालयात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी डॉ.सेमी पवार, डॉ.संदीप साबळे, डॉ.अनिल पाटील, डॉ.स्वप्नील चव्हाण यांनी रुग्णांची तपासणी केली.
याप्रसंगी सरपंच अनिल पाटील, उपसरपंच शकील पटेल, निवृत्ती पवार, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, संजय पाटील, बाबूलाल भोई, दिलीपसिंग पाटील, सुरेश पाटील उपस्थित होते.

Web Title: Free Dental Check-up Camp at Sakegaon, Bhusaval taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.