नीती आयोगाच्या बनावट कागदपत्राचा वापर करून ९४ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 08:48 IST2021-09-06T08:47:50+5:302021-09-06T08:48:11+5:30

ठगाला अटक; तब्बल १८० केंद्र चालकांना घातला गंडा

Fraud of Rs 94 lakh using fake policy documents | नीती आयोगाच्या बनावट कागदपत्राचा वापर करून ९४ लाखांची फसवणूक

नीती आयोगाच्या बनावट कागदपत्राचा वापर करून ९४ लाखांची फसवणूक

ठळक मुद्देसाखळीतील मुख्य सूत्रधार अविनाश ऊर्फ अर्जुन कळमकर (रा. दैठणे गुंजाळ, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पहाटे अडीच वाजता त्याच्या घरातून ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नीती आयोगाच्या बनावट कागदपत्राचा वापर करून प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या नावाने पिंप्राळा येथील महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या १८० केंद्र चालकांना ९४ लाख १४ हजार ८५३ रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

साखळीतील मुख्य सूत्रधार अविनाश ऊर्फ अर्जुन कळमकर (रा. दैठणे गुंजाळ, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पहाटे अडीच वाजता त्याच्या घरातून ताब्यात घेतले. कळमकर याच्यावर राज्यभर अशाच प्रकारची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. पिंप्राळा येथील योगिता उमेश मालवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मायभूमी ग्रामविकास संस्थेचा सचिव अविनाश ऊर्फ अर्जुन कळमकर, अध्यक्षा प्रीती विनायक खवले, उपाध्यक्षा प्रमिला अर्जुन कळमकर, खजिनदार कांचन दादाभाऊ ढगे, सदस्य शिवराम अप्पाजी जासूद, संगीता शिवराम जासूद व अर्जुन माधव कळमकर यांच्यासह इतर तीन अशा दहा जणांविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. डिसेंबर २०१८ ते १५ जानेवारी २०२१ या कालावधीत कळमकर याने १८० केंद्र चालकांकडून ९४ लाख रुपये उकळले. 

बीएचआरसारखीच पोलिसांची कारवाई
nया प्रकरणात बीएचआरसारखीच कारवाई झाली आहे. गुन्हा दाखल होण्याआधी कळमकर याची संपूर्ण माहिती घेण्यात आली. त्याच्या मागावर काही जण लावण्यात आले. 
nपोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी लगेच आर्थिक गुन्हे शाखेचे उपाधीक्षक भास्कर डेरे यांना पथक रवाना करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पहाटे अडीच वाजता घरात झोपलेला असतानाच कळमकर याला अटक करण्यात आली.

 

Web Title: Fraud of Rs 94 lakh using fake policy documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.